Others News

7th Pay Commission: वाढत्या महागाईत (Inflation) केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central Employees) जीवमान सुरळीत चालावे यासाठी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

Updated on 20 October, 2022 3:17 PM IST

7th Pay Commission: वाढत्या महागाईत (Inflation) केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central Employees) जीवमान सुरळीत चालावे यासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यातही वाढ करण्यात आली. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता पदोन्नती किंवा मूल्यांकनाची भेट मिळू शकते.

डिसेंबरमध्ये प्रमोशन चान्स

खरे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन सध्या बाकी आहे. याशिवाय त्याचे प्रमोशनही (promotion) होणार आहेत. कर्मचाऱ्यांचे सेल्फ असेसमेंट फॉर्म (Self Assessment Form) भरण्यात आले आहेत.

डिसेंबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती अपेक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीवरही चर्चा होऊ शकते.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने स्वस्त! 10 ग्रॅम सोने खरेदी करा 6000 रुपयांनी स्वस्त...

7 व्या वेतन आयोगांतर्गत पदोन्नती दिली जाईल

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे बाकी आहे. जुलैपर्यंत सर्व विभागांचे स्वयंमूल्यांकन करण्यात आले आहे. अधिकारी आढावा घेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यासंबंधीची फाईल पुढे सरकताच कर्मचाऱ्यांची पदोन्नती निश्चित झाली आहे. पदोन्नती होताच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. डिसेंबरपर्यंत मूल्यांकन पूर्ण होईल. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पदोन्नती आणि पगारवाढ केली जाईल.

शेतात उंदरांचा सुळसुळाट झालाय तर तज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय करा अन्यथा शेत होईल पोकळ

डीएच्या थकबाकीबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो

केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून डीए थकबाकीची मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचार्‍यांची मागणी आहे की त्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचे डीए थकबाकीही देण्यात यावी. मात्र, केंद्र सरकारशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

मात्र, पेन्शनर्स संघटनेने या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. आता नोव्हेंबरमध्येही कॅबिनेट सचिवांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये थकबाकी भरण्याबाबत सहमती होऊ शकेल, अशी आशा कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
एकच नंबर! शेतामध्ये बसवा हे आधुनिक उपकरण; हवामान आणि कीड ओळखून करेल मोबाईलवर अलर्ट
दूध उत्पादकानो द्या लक्ष! जनावरांच्या आहारात या 2 गोष्टींचा करा समावेश दुधात होईल भरघोस वाढ

English Summary: 7th Pay Commission: Another good news with the DA increase, now the promotion will also
Published on: 20 October 2022, 03:13 IST