7th Pay Commission: केंद्र सरकारने दसऱ्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा समान बोनस देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 12 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये बोनस मंजूर केल्याबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. रेल्वेमधील उत्पादकता लिंक्ड बोनसमध्ये देशभर पसरलेल्या सर्व नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांचा (RPF/RPSF कर्मचारी वगळता) समावेश होतो.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! बाळासाहेबांच्या नावे राज्यात 700 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करणार
यापूर्वी ७२ दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने बोनस दिला जात होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून ७८ दिवसांच्या पगाराच्या आधारे बोनस दिला जात आहे. या निर्णयामुळे रेल्वेवर सुमारे १८३२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
Published on: 03 October 2022, 04:15 IST