Others News

Spectrum Auction:सोमवारी भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. हा लिलाव तब्बल सात दिवस चालला व या लिलावाच्या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक 5जी दूरसंचार स्पेक्ट्रम ची विक्रमी विक्री झाली. या झालेल्या महालिलावामध्ये मुकेश अंबानी यांच्या जिओने आपले आघाडीचे स्थान मजबूत करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली व दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल राहिले.

Updated on 02 August, 2022 12:01 PM IST

Spectrum Auction:सोमवारी भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. हा लिलाव तब्बल सात दिवस चालला व या लिलावाच्या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक  5जी दूरसंचार स्पेक्ट्रम ची विक्रमी विक्री झाली. या झालेल्या महालिलावामध्ये मुकेश अंबानी यांच्या जिओने आपले आघाडीचे स्थान मजबूत करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली व दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल राहिले.

यामध्ये दीड कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या.5 जी हे हाय स्पीड मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सक्षम असलेल्या स्पेक्ट्रमची लिलावाच्या रक्कम गेल्या वर्षीचा विचार केला तर 77 हजार 815 कोटी रुपयांच्या 4जी स्पेक्ट्रम च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

नक्की वाचा:Petrol-Disel Price Today: संपूर्ण देशात मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग,जाणून घेऊ आजचे दर

ग्राहकांना याचा काय होईल फायदा?

1- देशामध्ये आता 5जी तंत्रज्ञान अवतरणार असून हे ग्राहकांसाठी एक आकर्षक असा अनुभव घेऊन येईल.

2- यामुळे आता देशातल्या कोणत्याही कोपर्‍यात किंवा कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी अतिशय सहजरित्या मिळेल.

3- इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रासह इतर सेवांवर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल.

नक्की वाचा:Agri News: 'कस्तुरी' करेल आता भारतीय कापसाचे जागतिक स्तरावर प्रमोशन, होईल कापसाची जोरदार मार्केटिंग

4- बफरिंग होण्यापासून सुटका मिळेल. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दोन जीबीचा एखादा मूव्ही म्हणजे चित्रपट डाऊनलोड करायचा असेल तर तो अवघ्या 20 ते 25 सेकंदामध्ये डाउनलोड करता येईल.

 या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5 जी

या झालेल्या महालिलावामध्ये जी कंपनी लिलाव जिंकलेली आहे या कंपनीला 5जीचा परवाना मिळेल. आणि हा परवाना संबंधित कंपनीसाठी वीस वर्ष वैध राहील. सर्व प्रक्रिया अगदी सुरळीत झाली तर देशात या वर्षाच्या शेवटी शेवटी 5जी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो लक्ष द्या! संपूर्ण राज्यात आजपासून होणार '-पीक पाहणी'ची नोंदणी, 'या' मिळणार सुविधा

English Summary: 5G service will start in india from end of this year and get high speed internet
Published on: 02 August 2022, 12:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)