दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत दिल्लीतील बांधकामे बंद करण्यात आली आहेत. अचानक बांधकामे बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.
त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उग्र होऊ नये म्हणून कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. अशा बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांना 5000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.
धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामगार मंत्री मनीष सिसोदिया यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यांनी मनीष सिसोदिया यांना सांगितले आहे की, जोपर्यंत बांधकाम पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत या मजुरांना दरमहा 5 हजार रुपयांची मदत देण्यात यावी.
PM Kisan : नाराज होऊ नका, फक्त हे काम करा, 30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात येतील 2000 रुपये
नुकताच GRAP चा तिसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे. दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. येथील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सातत्याने वाढत आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) चार दिवसांपूर्वी काही प्रकल्प वगळता संपूर्ण दिल्ली-NCR मध्ये बांधकाम बंदी घातली आहे.
EPFO पेन्शनधारक सावध! निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यावर आला हा नवा नियम
Published on: 02 November 2022, 03:04 IST