गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामध्ये पेट्रोल गॅस आणि खाद्यतेल याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अजूनही पेट्रोलच्या किंमतीत प्रचंड वाढ होत आहे. ही वाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. त्यामुळे अनेकजण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे वैतागले आहे. याला पर्याय म्हणून लोक जास्त मायलेज देणारी वाहने किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनांना पर्याय म्हणून बघत आहे. मात्र त्यामध्ये देखील अजून अनेक अडचणी येत आहेत.
असे असताना मायलेज असणारी वाहने खरेदी करण्यावर अनेकांचा भर असणार आहे. यामध्ये हिरो कंपनीला याचा मोठा फायदा झाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ३० दिवसांत हिरोच्या एका मोटारसायकलचे २ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस असे या मोटरसायकलचे नाव आहे. यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे. हिरो स्प्लेंडर प्लस ही देशातील तसेच कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक बनली आहे.
या बाइकची किंमत, मायलेज सर्वसामान्य लोकांना परवडणारे आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ८० किमी प्रतिलीटर मायलेज देते. हे मायलेज एआरआयने प्रमाणित केले आहे. यामुळे अनेकांनी ही गाडी खरेदी केली आहे. जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये हिरो स्प्लेंडरला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तसेच या बाईकची सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.
या बाईकच्या २,०८,२६३ युनिट्सची विक्री केली होती. तर कंपनीने जानेवारी २०२१ मध्ये या बाईकच्या २,२५,३८२ युनिट्सची विक्री केली होती. जानेवारी २०२२ ची विक्री जानेवारी २०२१ पेक्षा कमी असतानाही, ती इतर बाईक्सच्या तुलनेत खूप पुढे आहे. या गाडीला ९७.२ सीसी इंजिन दिले आहे, जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या इंजिनच्या मदतीने ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएमचा पीक टॉर्क मिळवता येतो. हिरो स्प्लेंडरची किंमत ६५,५१० रुपये (एक्स-शोरूम) आहे, या बाईकचा टॉप मॉडेल ७०,७९० रुपयांपर्यंत जाते. यामुळे ही गाडी परवडते.
Published on: 02 March 2022, 10:31 IST