Manmad-Indore Railway :- बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला मनमाड ते इंदोर यादरम्यानच्या रेल्वे मार्गाचा कामातील अडथळा आता दूर होण्याची चिन्हे दिसत असून या रेल्वे मार्गाकरिता आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल आता तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील काही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाचा आहे.
जर आपण साधारणपणे महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये धुळे आणि नाशिक आणि मध्य प्रदेश राज्यातील इंदोर, खरगोन, धार तसेच बारवानी या जिल्ह्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.आज सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाकडे मांडण्यात आला
असून अगोदर दहा हजार कोटी किंमत असलेल्या या प्रकल्पाची किंमत तब्बल आता 22000 कोटी पर्यंत वाढली आहे. सध्या या रेल्वे मार्गाचे धुळे आणि मनमाड या अंतरामध्ये पन्नास किलोमीटरचे काम सुरू असून अजून उर्वरित 218 किलोमीटरसाठी काम बाकी आहे. कमीत कमी 2200 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून आता काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या रेल्वे मार्गामुळे इंदोर आणि मुंबईचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे बोर्ड आता या अहवालाची तपासणी करून सदर अहवाल नीती आयोगाकडे पाठवेल व नीती आयोग त्याचा अभ्यास करून मंत्रालयाकडे हा अहवाल पाठवेल व याच्यावर अंतिम निर्णय किंवा अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय मंत्रिमंडळ करेल.
या पद्धतीचा आहे हा रेल्वे प्रोजेक्ट
इंदोर ते मनमाड हा रेल्वे मार्ग एकूण 268 किलोमीटरचा असून त्यापैकी सध्या धुळे ते मनमाड दरम्यान पन्नास किलोमीटरचे काम सुरू आहे. उरलेल्या 218 किलोमीटरसाठी 2200 चे हेक्टर जमिनीची आवश्यकता असून 268 किलोमीटर अंतरामध्ये तीनशे छोटे आणि मोठे फुल उभारण्यात येणार आहेत.
यामध्ये नऊ बोगद्यांचा समावेश असून त्यांची लांबी वीस किलोमीटर पेक्षा जास्त असणार आहे. तसेच 34 स्टेशन देखील या मार्गावर उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याची अपेक्षित किंमत 22 हजार कोटी पेक्षा जास्त आहे.
Published on: 10 August 2023, 10:36 IST