असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि उत्पन्नाचे 15000 पेक्षा कमी असेल तर अशा कामगारांसाठी एक खुशखबर आहे. असे कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून दुर्घटना आणि आजारपणा दरम्यान येणाऱ्या खर्चाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
ईश्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कुठलाही अपघात झाला तर कामगारांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे.तसेच संबंधित कामगाराच्या कुटुंबासाठी वार्षिक पाच लाखापर्यंत आरोग्य सुरक्षा कवच देखील आयुष्यमान योजनेद्वारे मिळणार आहे.
असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार,फेरीवाले,स्थलांतरित कामगार, कृषि कामगार,मनरेगा कामगार, रिक्षा चालक इत्यादींचा समावेश होतो. परंतु प्रमुख अट आहे की, मासिक उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
1-जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही स्वतः नोंदणी करू शकतात. यासाठी आश्रम पोर्टलच्या www.eshram.gov.inया संकेतस्थळाला भेट द्यावी. यांचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी नोंदणी करण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर मध्ये जावे अशा कामगारांची नोंदणी बायोमेट्रिक पद्धतीने केली जाईल.ई श्रम कार्डला सीएससी कडून कागदावर प्रिंट करून कामगारांना दिले जाईल. नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
या योजनेत कोणी नोंदणी करू शकतो?
- ज्या कामगारांचे वय 16 ते 59 वर्षेआहेआणि कर्मचारी भविष्यनिर्वाह संस्था किंवा राज्य विमा महामंडळ जातींचे संबंधित लाभार्थी नाहीत.
- असे कामगार जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत.
- असे कामगार जे सरकारी कर्मचारी नाहीत.
Published on: 01 October 2021, 01:40 IST