मित्रांनो जर आपणांस कमी कालावधीत अधिक पैसा कमवायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खास आहे. देशात असे अनेक हौषी लोक असतात ज्यांना जुन्या कॉइन्सचा तसेच नोटांचा संग्रह करण्याची आवड असते. असे लोक त्यांच्या संग्रहात जुन्या नोटांचा आणि कॉइनचा समावेश करत असतात. आपण अशा लोकांना जुन्या नोटा अथवा कॉइन विक्री करून चांगली मोठी कमाई करू शकता. जर आपल्याकडे जुनी दहा रुपयाची नोट असेल तर आपणास तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.
देशात कॉइन बाजार नावाची एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर अनेक लोक जुन्या नोटांची खरेदी विक्री करत असतात. जर आपल्याकडे जुनी दहा रुपयाची एक विशेष नोट असेल तर आपण या साईटवर ती नोट विक्री करून चांगला मोठा नफा कमवू शकता. मित्रांनो 1943 साली दहा रुपयाची एक विशेष नोट चलनात आली होती या नोट वरती एका बाजूस अशोक स्तंभ आहे तर दुसर्या बाजूस एक होडी बनलेली आहे, तसेच या नोटवरती तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर सीडी देशमुख यांचे हस्ताक्षर देखील आहे. या नोटच्या दोन्ही बाजूस 10 रुपये लिहिलेले असणे अनिवार्य राहणार आहे. जर आपल्याकडे वर नमूद केलेल्या नोटासारखी दहा रुपयाची नोट असेल तर आपण ही नोट कॉइन बाजार या साइटवर विकू शकता.
मित्रांनो यासाठी आपणांस coinbazzar.com वर लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर या साईटच्या होमपेजवर, रजिस्टर असा पर्याय दिसेल यावर क्लिक करून स्वतःची विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. 10 रुपयांच्या नोटेच्या स्पष्ट आणि योग्य फोटो काढून ते प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे लागते, जे लोक अशा नोटांच्या शोधात असतात ते लोक ही अशी 10 रुपयांची जुनी नोट खरेदी करण्यास या साईटवर हजेरी लावत असतात. जर अशा लोकांना आपली नोट पसंत पडली तर या नोटची विक्री केली जाऊ शकते.
Disclaimer: सदर लेखात दिलेली माहिती ही ऑनलाईन संकेतस्थळावरून प्राप्त करण्यात आली आहे, या लेखात दिलेली माहिती ही 100 टक्के खरी असल्याचा दावा कृषी जागरण मराठी करत नाही. असे व्यवहार करण्याआधी सावधानता बाळगण्याचा सल्ला आरबीआयकडून देण्यात आला आहे. हा लेख केवळ वाचक मित्रांच्या आवडीनुसार आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतेही वित्तीय व्यवहार करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.
Published on: 03 March 2022, 01:42 IST