Others News

गेल्या काही दिवसांपासून Tata Nexon Car ही खूप चर्चेत आहे. Tata Nexon गाडीचा लूक, किंमत, मायलेज, आणि फीचर्स यामुळे लोकांना गाडी पंसंतीस पडत आहे. गेल्या महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप १० वाहनांच्या यादीत Tata Nexon Car चा समावेश आहे.

Updated on 22 February, 2022 4:51 PM IST

गेल्या काही दिवसांपासून Tata Nexon Car ही खूप चर्चेत आहे. Tata Nexon गाडीचा लूक, किंमत, मायलेज, आणि फीचर्स यामुळे लोकांना गाडी पंसंतीस पडत आहे. गेल्या महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप १० वाहनांच्या यादीत Tata Nexon Car चा समावेश आहे.

Tata Nexon Car चे फीचर्स

टाटा ने यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), ऑटो एसी, टायर प्रेशर मॉनिटरिंग, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), चाइल्ड सीट ISOFIX, स्पीड अलर्ट सिस्टीम यांसारखी खास फीचर्स दिली आहेत. बाजारात ही SUV Kia Sonet आणि Nissan Magnite सारख्या SUV ला टक्कर देते.

महत्त्वाच्या बातम्या - Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज ! असा करा अर्ज आणि घ्या लाभ

Tata Nexon इंजिन

या SUV मध्ये कंपनीने 1.5-लीटर टर्बो चार्ज केलेले डिझेल इंजिन आणि 1.2-लीटर टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन वापरले आहे. याचे डिझेल इंजिन 110PS पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. तसेच याचे पेट्रोल इंजिन 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. ही SUV ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

१ लाखात नवी कार

जर तुम्ही 1 लाख रुपयेचे डाउन पेमेंट भरून Tata Nexon XE पेट्रोल खरेदी केले, तर कार देखो EMI कॅल्क्युलेटर नुसार, या कारची EMI 5 वर्षांसाठी 15,827 रुपये प्रति महिना असेल. व बँक कर्जानुसार 9.8 टक्के व्याज दर लागेल. यासोबतच फायनान्स मिळाल्यावर तुम्हाला 5 वर्षात सुमारे 2,01,252 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

English Summary: 1 lakh new popular Tata Nexon Car
Published on: 22 February 2022, 04:51 IST