News

Congress President Election: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election 2022) होईल नकार दिला होता. मात्र आज काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

Updated on 28 August, 2022 11:41 AM IST

Congress President Election: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election 2022) होईल नकार दिला होता. मात्र आज काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज काँग्रेस कार्यकारिणीची (Congress Executive) बैठक होणार आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसची कमान (Congress President) राहुल गांधी यांच्या हाती जाणार की काँग्रेसमधील दुसरा कोणता नेता अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मनधरणी करून अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा आग्रह करणार आहेत.

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. यामध्ये अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असून सोनिया गांधी (Sonia Gandhi) किंवा राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की नाही? सरकारने दिली माहिती...

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये गळती सुरु झाली आहे. ती अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काँग्रेसमधील मोठं मोठ्या नेत्यांनी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता नुकताच गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monsoon Update: राज्यात पावसाची उघडीप! १ सप्टेंबर पासून पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस...

सोनिया गांधी आजारी असल्यामुळे सध्या त्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याही त्यांच्यासोबत असल्यामुळे काँग्रेसची कारकारीणीची बैठक ऑनलाईन होणार आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari: "विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही"
Gold Silver Price: सोन्या चांदीच्या दरात नरमाई! चांदी 24300 रुपयांनी स्वस्त...

English Summary: Will Rahul Gandhi lead the Congress or will the Congress go to someone else?
Published on: 28 August 2022, 11:41 IST