स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरातील साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सीमाभागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या मोर्चाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरु होती.
साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामामध्ये पुरवलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रूपये द्यावेत, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यंदा आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बाजारातही साखरेच्या दरात चांगली वाढ झाली आहे. इथेनॉल आणि वीज उत्पादनातूनही साखर कारखान्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे.
साखर कारखान्यांना मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नातील शेतकऱ्यांच्या ह्काचे प्रति टन ४०० रुपये मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका शेट्टी यांनी यावेळी मांडली. सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल गंभीर नाही. ऊस उत्पादकांना तत्काळ ४०० रूपयांचा दुसरा हप्ता द्यावा. मागचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय हा हंगाम सुरू होऊ देणार नाही.
साखर कारखानदारांनी एफआरपी आणि अधिकचे प्रति टन ४०० रुपये द्यावेत, अशी रास्त मागणी आम्ही केलेली आहे. यासाठी साखर कारखान्यांना आम्ही २ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत जर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन ४०० रुपये जमा केले नाहीत, तर आम्ही कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
मोठी बातमी! मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली मोठी घोषणा...
इतकेच नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही ते म्हणाले. महागाईमुळे शेती करणे शेतकऱ्यांसाठी जिकीरीचे बनले आहे. मात्र तरीही कारखानदार शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम द्यायला तयार नाहीत. यंदा साखरेचे दर चांगलेच वाढले आहेत. त्याचबरोबर इथेनॉल, वीज यासारख्या उपपदार्थ यांच्या निर्मितीतूनही कारखान्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे, असेही ते म्हणाले.
आज लाडक्या सर्जा-राजाचा सण बैलपोळा, शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा...
Published on: 14 September 2023, 05:05 IST