News

दरवर्षी एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कामगार दिवस कामगारांचे कर्तुत्व साजरे करण्यासाठी आणि कामगारांचे शोषण याबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा सगळ्या जगभरात साजरा केला जातो.

Updated on 01 May, 2021 1:04 PM IST

 दरवर्षी एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो.  या दिवसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कामगार दिवस कामगारांचे कर्तुत्व साजरे करण्यासाठी आणि कामगारांचे शोषण याबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा सगळ्या जगभरात साजरा केला जातो.

कामगार दिनाचा इतिहास पाहू

 ही गोष्ट 1989 या वर्षाचे आहे.  त्या वर्षी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसाचे आठ तासांपेक्षा जास्त कामं करण्याची मागणी केली. त्यानंतर हा एक वर्षी कार्यक्रम झाला आणि एक मे कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.  जगाचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर जगातील सगळ्यात देशात कमी अधिक प्रमाणात कामगारांचे शोषण केले जायचे. दिवसाचे जवळजवळ पंधरा तास त्यांना राबवले जायचे.या अन्यायाविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्का  विरोधात आवाज उठवण्यात सुरुवात केली.  यामध्ये त्यांनी दररोज आठ तासाची ड्युटी आणि पगारी रजेची मागणी केली.

हेही वाचा : माझं मत - ''शेती करा समाधानी राहा''

जर भारताचा विचार केला तर चेन्नईमध्ये सन 1923 मध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला होता.  हा दिवस लेबर फार्मस पार्टी ऑफ इंडियाने साजरा केला होता.  या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्लापुरम सिंगार आवेलु चेतीअर यांनीही सरकारला सांगितले की कामगारांच्या प्रयत्नांची आणि कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा.

हा दिवस कसा साजरा करतात

 या दिवशी निषेध,  संप आणि मोर्चे होतात.  परंतु या वेळी कोरोना महामारी मुळे उत्सव काही वेगळे असतील.  कोरोनाव्हायरस मुळे कार्यक्रमांवर बंदी असून लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यामुळे काही छोट्या स्वरुपात कार्यक्रम साजरे केले जात आहे.

English Summary: Why is May 1 celebrated today as Labor Day?
Published on: 01 May 2021, 12:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)