News

लोकसभेत मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या विरोधात बोलत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या शेती, आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.

Updated on 09 August, 2023 9:56 AM IST

लोकसभेत मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या विरोधात बोलत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या शेती, आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ९ वर्षांपूर्वी बहुत हुई मंहगाई की मार, अबकी बार... म्हणतं सत्तेवर आलेलं भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाई झाली. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणारे सरकार कांदा, डाळ, तेल, दूधाला भाव देत नाही आणि परदेशातून आयात काय करताय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

राज्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. त्यावेळी कांदा निर्यातीची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. जगभरात कांद्याचे उत्पादन घटले होते.

गोकुळकडून जनावरांच्या लम्पी आजाराकडे, गोकुळचे चेअरमन, संचालकांना दौरा सोडून जाण्याची वेळ..

तेव्हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. त्यावेळीच कांदा बाहेर पाठवायला हवा होता. पण तसं झालं नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...

दरम्यान, देशभरातल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ करून टाका. हे १८.२ लाख कोटी कुणाचे माफ केले कुणास ठाऊक. यात शून्य किती लावलेत तेही कळतं नाही. एवढं माझं चांगलं गणित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप, महसूल विभागाचा निर्णय..
चंद्रशेखर राव उद्या इस्लामपूरममध्ये! आठवड्यात दुसरा दौरा असल्याने चर्चा सुरू, रघुनाथदादा यांची शेतकरी परिषद होणार..

English Summary: Why don't you give price to the milk here and import it from outside? Supriya Sule's attack on the Modi government...
Published on: 09 August 2023, 09:56 IST