News

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

Updated on 02 June, 2021 11:46 PM IST

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

यंदा मान्सून भरपूर बरसणार! १०१ % पर्जन्यवृष्टीची शक्यता: हवामान विभाग दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast) वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडू शकतो.

स्वावलंबी आणि डिजिटल इंडिया कृषी क्षेत्रा शिवाय शक्य नाही :तोमर : कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, स्वावलंबी आणि डिजिटल इंडियाचे स्वप्न कृषी क्षेत्राला सोबत घेऊन गेल्यानेच साकार होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी, या संदर्भात देशाला मार्ग दाखविला आहे, ज्याच्या आधारे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी क्षेत्राच्या डिजिटायझेशनसाठी ठोस पावले उचलली आहेत.आणि यात त्यांना चांगली मदत सुद्धा मिळत आहे.

 

देशातील फळे निर्यातीमधील राज्याचे प्रथम स्थान अधिक मजबूत करा – संदिपान भुमरे : केंद्र शासनाने जागतिक बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी वाढविण्यासाठी फलोत्पादन समूह क्षेत्रविकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजनेस प्रारंभ केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पिकाच्या समूहाचा सामावेश करण्यात आला आहे. या समूहातील क्षेत्रात निर्यातक्षम उत्पादन, मूल्यवृद्धी व विक्री व्यवस्थापनावर भर देण्यात आला असून, याकरिता दोन्ही क्लस्टरसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

विमा नसलेल्या शेतकऱ्यांना देखील सरकारने मदत करावी – फडणवीस : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी केळीच्या बागांचे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेत आहेत.

जळगावमधील नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करा -विजय वडेट्टीवार : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झाल आहे.

English Summary: Whole Day Top News in Agriculture 02 june 2021
Published on: 02 June 2021, 11:46 IST