News

सध्या अनेक ठिकाणी बैलगाडा शेयतींचे आयोजन केले जात आहे. यासाठी काही नियम दिले गेले आहेत. यामध्ये बैलगाडी शर्यतीच्या आयोजकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे किमान १५ दिवस अर्ज करून परवानगी घ्यावी. आयोजनाच्या ठिकाणी वळू अथवा बैलांसाठी आरामासाठी पुरेशी सावली / निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. वळू अथवा बैलांसाठी असलेल्या आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी. उत्सवामध्ये नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकीय व्यवसायीची सेवा किंवा पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.

Updated on 27 May, 2023 10:45 AM IST

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू नये. यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी नाही.
बैलगाडी शर्यतीची धावपट्टी १००० मीटर पेक्षा अधिक लांबीची नसावी. धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खडक असलेली, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेली नसावी. धावपट्टीच्या पुढे बैलगाडीचा वेग मंदावण्याकरिता पुरेशी सपाट जागा उपलब्ध करावी. बैलगाडी शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करण्यात येवू नये. बैलांना किंवा वळूना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आराम द्यावा.

बैल घोड़ा व १००० मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यती प्रतिबंधीत. कोणत्याही बैलांचा किंवा वळूचा वापर एका दिवसामध्ये ३ पेक्षा अधिक शर्यतीसाठी करण्यात येवू नये. केवळ एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल.

अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडी भोवती चालविता येणार नाही. गाडीवान गाडीवर कोणतीही काठी, चाबूक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करू शकेल किंवा बैलास विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतेही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही.

बैलाचे पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे, पायाने मारणे, चाबूक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का देणाऱ्या साधनाचा वापरणे अथवा जननअंग पिळणे अथवा जननअंगावर लाथ मारणे अथवा आरुने जनन अंगास इजा पोहोचवणे अथवा शेपूट पिरगळणे अथवा शेपटीचा चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध असेल.

हा आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, एका किलोच्या किमतीत येईल महिन्याचा बाजार..

आयोजनाच्या ठिकाणी वळू अथवा बैलांसाठी आरामासाठी पुरेशी सावली / निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. वळू अथवा बैलांसाठी असलेल्या आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी. उत्सवामध्ये नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकीय व्यवसायीची सेवा किंवा पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.

निरीक्षक व समिती सदस्य यांचेसाठी आयोजनाचे निरीक्षण करणेसाठी व्यवस्था करावी. बैलांना किंवा वळूना शर्यती अगोदर किंवा त्यादरम्यान कोणतेही उत्तेजक औषधीद्रव्ये, अल्कोहोल, क्षोभक इत्यादी दिली जात नसल्याची खात्री करावी. शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही गाडीवानाला अल्कोहोल किंवा मादक द्रव्य प्राशन करण्यास किंवा बाळगण्यास मनाई असेल.

हिंगोलीत मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मोठा अपघात, 150 मेंढ्या आणि 5 जणांचा जागीच मृत्यू...

बैलगाडी शर्यतीच्या आयोजनाचे संपूर्ण चित्रिकरण करून १५ दिवसाच्या आत जिल्हाधिकारी यांना डिजीटल स्वरूपात २ प्रतीत सादर करावे. शर्यतीच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी वैद्यकीय सेवा किंवा रुग्णवाहिका सुविधा व प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सावधगिरीच्या उपाययोजना उपलब्ध आहेत याची सुनिश्चिती करावी.

बैलांच्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूस सुरक्षित अंतरावर प्रतिबंधात्मक कठडे उभारावेत अथवा इतर सुरक्षेचे उपाय करावेत जेणेकरुन प्रेक्षकांचा उपद्रव हा धावणाऱ्या बैलांना होणार नाही.

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर FRI दाखल करा, देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश..
पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बालाजी खैरे तर उपसभापतीपदी रुख्मीनबाई पिसाळ यांची निवड!
श्रीमंतांची भाजी! ही भाजी एक लाख रुपये किलो दराने विकली जाते, मोजकेच लोक खातात ही भाजी..

 

English Summary: While organizing bullock cart races, government announced rules, read the rules, fine of 5 lakhs...
Published on: 26 May 2023, 04:38 IST