News

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील अनेक सोयाबीन खरेदीदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. रोख रक्कम हातात येत असल्याने शेतकरी देखील या खरेदीदारांकडे आकर्षित होतात. परंतू त्यांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated on 04 April, 2022 4:06 PM IST

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाने राज्य पिक उत्पादनाचा मान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अस्मानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना हे कमी भांडवल लागणारे पीक सध्या आपले वाटू लागले आहे. मात्र, दुर्दैवाने उत्पादनानंतर त्याची फसवणूक सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील अनेक सोयाबीन खरेदीदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. रोख रक्कम हातात येत असल्याने शेतकरी देखील या खरेदीदारांकडे आकर्षित होतात. परंतू त्यांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोयाबीनचा दर ठरवताना एका क्विंटलमागे ३ किलो वजन कापण्याचा नियम सांगण्यात येतो. अनेक व्यापारी असे करत असल्याने आपण शेतमाल विकत असलेला व्यापारी सुद्धा योग्य असल्याचा समज शेतकऱ्यांचा होता आणि शेतकरी त्याला सोयाबीन विक्री केली जाते. मात्र, घाईघाईने आणि शेतकऱ्याला बोलण्यात गुंतवून सोयाबीनची खरेदी केली जाते. यावेळी वजने करताना किलोच्या वरील २०० ते ७०० ग्रॅम सोयाबीन गृहीत न धरता वजने केली जातात.

प्रत्येक कट्ट्यामागे दोन किलो वजन कडता नावाने वजन कापण्यात येते. शिवाय धुळे येथील व्यापारी क्विंटल मागे ३ किलो आम्हाला कडता करत असल्याचे सांगत पुन्हा एकूण वजनाच्या क्विंटल मागे ३ किलो वजन वजा करण्यात येते. त्यामुळे वजनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट जुन्नर तालुक्यातील खासगी सोयाबीन विक्रेते करत आहेत.

शिवाय काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये माती असल्यास त्याच्या प्रत्येक कट्ट्यामागे तीन किलो वजन कडता म्हणून कापण्यात येते. शेतकऱ्याने याबाबत व्यवहार योग्य नसल्याचे विषय काढताच शेतकऱ्यांचे नाव आणि गाव विचारून गावातील चांगल्या व्यक्तीची ओळख सांगण्यात येते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या शेतकऱ्याचे कौतुक करून त्याला लुटमारीचा प्रकार जुन्नर येथे सुरु आहे. शिवाय सोयाबीन विकल्यावर फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच व्यापाऱ्याला काही विचारणा केल्यास शेतकरी पाहून भाषाशैली वापरण्यात येते शिवाय तुमचे सोयाबीन मातीचे असून विकत घेतले असे सांगत आम्ही तुमच्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणण्यात येतो.

शिवाय या व्यापाऱ्यांकडून कोणतेही पक्के बिल दिले जात नाही. तर बाजार समिती या व्यापाऱ्यांशी आमचा कोणताच संबंध नसल्याचे सांगत असल्याने शेतकरी पूर्णतः हतबल होत आहे. तर बाजार समिती आवारात शेतकऱ्याची फसवणूक झाल्यास बाजार समिती जबाबदारी घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून देते. शिवाय योग्य दर देऊन फक्त दोन किलो कडता क्विंटल मागे कापला जातो. मातीचे सोयाबीन असल्यास शेतकऱ्याला तडजोडीने व्यवहार केला जातो. त्यामुळे बाजार समिती आवारात व्यापाऱ्यांनाच सोयाबीन विक्रीचे आवाहन बाजार समिती करत आहे.

महत्वाच्या बातम्या'
शेतकऱ्याच्या अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा! पीक संरक्षणासाठी बनवले अनोखे जुगाड..
बातमी कामाची! आता गोवंश पालन करण्यासाठी सरकार देणार 25 लाखाचे अनुदान
काहीही करा पण ऊस तोडा गड्यांनो! आता ऊस तोड मजुरांना प्रतिटन 50 रुपये वाढीव रक्कम

English Summary: While buying soybeans, private traders came up with shocking information.
Published on: 04 April 2022, 04:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)