टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे शहरी भागात ओरड सुरु झाली आणि सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पण जेव्हा टोमॅटोचे भाव पडून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर होता, भरल्या शेतात बकऱ्या सोडत होता तेव्हा सरकारला जाग का आली नाही.
तेव्हा सरकारने भाव वाढविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत..? हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न आहे. टोमॅटो ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे त्याचे भाव वाढल्याने एवढी ओरड करण्याची गरज नाही.
शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त जावे यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. टोमॅटोचे भाव वाढले म्हणून इंटरनॅशन विषय करणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये.
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
उगाच कांगावा करण्याची गरज नाही. तुमच्या मालकीच्या हॉटेल मधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का..? सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
दरम्यान सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे अनेकजण यावर संताप व्यक्त करत आहेत. यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याबाबत पोस्ट लिहिली आहे. सध्या शेतकरी नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...
गुणवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...
नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा
Published on: 17 July 2023, 10:13 IST