शेतकरी नेते राजू शेट्टी सतत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असतात. याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होतो. खासकरून ऊस आंदोलन आणि दुधाचे आंदोलन करून त्यांनी शेतकऱ्यांना मोठा फायदा करून दिला आहे. सध्या त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.
यामध्ये ते म्हणतात, २०१२ साली ऊस आंदोलनाने राज्यात व विशेषकरून कोल्हापूर जिल्ह्यात रौद्ररूप धारण केले होते. बंदुकीतून गोळ्या बाहेर पडावेत तसे शेकडो कार्यकर्त्यांच्यावर त्यावर्षी गुन्हे दाखल झाले. जामीनदार शोधण्यासाठी धावपळ सुरू होती.
त्याकाळी मी येरवडा काराग्रहात अटक असताना देखील किणी टोल नाका येथे झालेल्या आंदोलनात माझ्यावर गुन्हा दाखल झाला. यावेळी मला जामीन झालेले भीमराव मगदूम (आबा ) सावर्डे ता. हातकंणगले आज माझ्यासोबत कोर्टासमोर हजर झाले. मला आज आबांचे या वयातील उत्साह बघून लढण्यासाठी नवीन उर्जा मिळाली.
अवकाळी पावसाने नुकसान, पण राज्यांनी अहवाल पाठवले नाहीत: केंद्र सरकारची माहिती
आबांसारखी चळवळीवर प्रेम करणारी अशी माणस सोबत आहेत यामुळेच कितीही गुन्हे दाखल झाले तरीही आंदोलनांतील धग तशीच जिवंत आहे. असे त्यांनी म्हटले आहे. आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोगलगाय शेतकऱ्यांच्यापुढचे टेन्शन
याबाबत आता अनेक ठिकाणी कोर्टात जावे लागते. यामुळे वकील जमीनदार याची फौज तयारच असते. ऊस दराच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनो पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो लव्हाळा व्यवस्थापन करताना या गोष्टी आहेत आवश्यक, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर, जाणून घ्या..
Published on: 24 March 2023, 09:46 IST