News

शेतकऱ्यांनो शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे.

Updated on 22 May, 2023 10:47 AM IST

शेतकऱ्यांनो शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे.

यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. तसेच मशागतीची कामे करत आहेत. पंजाबराव डख यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली.

तसेच येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता नेमका किती पाऊस पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनाही मिळणार! फक्त या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही

दरम्यान, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले.

मोठी बातमी! बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती आली समोर..

दरम्यान, राज्यभरातील शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष यंदाच्या मान्सूनकडे (Mansoon) लागले असून, यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..
कारखान्यांची धुराडी बंद होऊन 3 महिने झाले FRP मात्र मिळेना, शेतकरी अडचणीत..
कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..

English Summary: What is the state of rain in the state this year, when will the monsoon come, Punjabrao Dakh's first prediction has come out.
Published on: 22 May 2023, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)