What Is Red, Orange, Yellow And Green Alert: पाऊस, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.
अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्स बद्दल.
Red Alert रेड अलर्ट:
रेड अलर्ट म्हणजे मोठी नैसर्गिक आपत्तीची शक्यता. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशातील स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं गरजेचं असतं.
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.
Rain Update: "काय तो पाऊस, काय ते पाणी, काय ते रस्ते"; मुंबई तुंबली...
Orange Alert ऑरेंज अलर्ट:
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार होऊ शकतात.
येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.
Yellow Alert यलो अलर्ट:
पुढील काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे संकट ओढवण्याची शक्यता असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो. या संकटामुळे दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा देण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो. सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.
IMD Alert: राज्यातील 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता
Green Alert ग्रीन अलर्ट:
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे. कोणत्याही संकटाची चाहुल नाही. सारं काही सुरळीत आहे, हे दर्शवणारा ग्रीन अलर्ट असतो. पूर्वी जारी केलेला येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला जातो.
'गल्ली ते दिल्ली पावसाचा अंदाज"; 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
Published on: 05 July 2022, 04:38 IST