News

जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे.तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक ( fungicide) सर्वोत्तम विषाणू नाशक (antiviral) जंतूरोधक ( antidavil )व सर्वोत्तम संजिवक ( harmons) आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा.

Updated on 13 February, 2023 12:57 PM IST

जिवामृत म्हणजे काय ?
जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे.तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक ( fungicide) सर्वोत्तम विषाणू नाशक (antiviral) जंतूरोधक ( antidavil ) व सर्वोत्तम संजिवक ( harmons) आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा.

जिवामृत कसे द्यावे ?
1) सिंचनाच्या पाण्यातून देणे.
2)सरळ जमिनीवर टाकणे.
3)उभ्या पिकावर फवारणी करणे
तिन्ही प्रकारे सर्वोत्तम रिजल्ट.

जिवामृताच्या फवारणीचा परिणाम.
1) कोणत्याही झाडांची हिरवी पाने दिवसा अन्न निर्मिती करतात.या प्रक्रीयेला प्रकाशसंश्लेषन क्रिया म्हणतात. एक चौ.फुट हिरवे पान एका दिवसात सुर्यप्रकाशामधुन 12.5 kg. कॅलरी सुर्य ऊर्जा पानामध्ये जमा करतात व हवेतून कर्बाम्ल वायु घेऊन (कार्बन डाय ऑक्साईड) व जमिनीतून पाणी घेऊन 1 चौ.फुट पान एका दिवसाला 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करते व त्यापासून आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्याचं उत्पादन मिळतं. 2.5 ग्रॅम फळांचं टनेज मिळतं 
याचा अर्थ जर आपण पानाचं आकारमान दुप्पट केलं तर उत्पादन दुप्पट होईल.पानाचं आकारमान वाढविणारे काही संजिवके (harmons) असतात ते जिवामृता मध्ये असतातच म्हणून जिवामृत फवारले कि पानाचा आकार वाढतो.

2) पिकांच्या पानावर सतत रोग निर्माण करणा-या बुरशीचा व जंतूंचा हल्ला होत असतो . जिवामृत हे अत्यंत उपयुक्त बुरशीनाशक व जंतूरोधक आहे म्हणून जिवामृत फवारल्यावर पिकांवर रोग येत नाही.

नियोजन उन्हाळी भुईमूग हंगामाचे

3) पिकांवर किडींचा हल्ला सतत होत असतो व जर पानामध्ये प्रतिकारशक्ती नसेल तर पानं किडींना बळी पडतात. जिवामृतामध्ये पानांना प्रतिकारशक्ती देणारे काही antibiotics असतात त्यामुळे जिवामृत फवारणीने पानामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते व पिके किडीपासून वाचतात.

4) आणीबाणीत जर मुळांच्या माध्यमातून पानांना नत्र मिळाला नाही तर पानांची वाढ थांबते परंतु काही जिवाणु असे आहेत कि जे पानावर बसून थेट हवेतून नत्र घेतात व पानांना पुरवतात.
त्यापैकी acito dizotopicus सारखे जिवाणु यामध्ये मुख्य भुमिका वठवतात. हे जिवाणु जिवामृतात असतातच त्यामुळे हे जिवाणु हवेतून नत्र घेउन पानांना देतात व झाडांची वाढ चालु ठेवतात.

5) सुर्यप्रकाशासोबत अतीनील किरणांसारखी अत्यंत घातक विविध किरणे येत असतात ते किरण पानावर पडले की झाडांमधील अनुवंशिक गुणधर्मांमध्ये बदल होतो व झाडांमध्ये विकृती निर्माण होते. जिवामृताची फवारनी या विविध किरणांपासुन सहनशीलता देते.

गहू काढणीसाठी 'हे' छोटे कृषी यंत्र ठरतंय खूपच फायद्याचं, वेळ आणि पैसाही वाचतोय

वेगवेगळ्या पिकांच्या पानांना सुर्यप्रकाशाची वेगवेगळी तिव्रता सहन करण्याची क्षमता असते. जेंव्हा ऊन्हाळ्यामध्ये ( मार्च ते जुन) सुर्य प्रकाशाची तीव्रता 8000 ते 12000 फुट कँडल पर्यंत वाढते.

ज्या पिकांना ही तीव्रता सहन होत नाही त्या पिकांची पाने या उन्हामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढवतात. व त्यामुळे पानामध्ये ओलावा टिकत नाही व पाने सुकण्याची शक्यता असते अशावेळी पाने मुळांना संदेश पाठवतात,संदेश मिळताच मुळे पाणी पानांकडे पाठवतात. ओलावा पानांमध्ये येताच ताबडतोब बाष्पीभवनाने निघुन जातो,अशा त-हेने जमिनीतील ओलावा वेगाने घटतो परिणामी पानं पिवळी पडतात, करपतात व सुकतात.

महत्वाच्या बातम्या;
विषमुक्त शेती व पशु विषयक उत्पादनांचा लोकप्रिय ब्रँड - इरिच इंडिया...
शेतीबद्दल सकारात्मक विचार गरजेचा
शेतकऱ्यांनो हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? जाणून घ्या..

English Summary: What is Jivamrit? Farmers know the effect of Jivamruta spraying..
Published on: 13 February 2023, 12:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)