News

लग्न म्हटलं की अमाप खर्च हा आलाच. त्यात लग्न आयुष्यात एकदाच होत त्यामुळे ते थाटामाटातच झालं पाहिजे असा अट्टहास बरेच जण धरतात.

Updated on 25 May, 2022 4:02 PM IST

लग्न म्हटलं की अमाप खर्च हा आलाच. त्यात लग्न आयुष्यात एकदाच होत त्यामुळे ते थाटामाटातच झालं पाहिजे असा अट्टहास बरेच जण धरतात. शिवाय लग्न सोहळ्यात सर्व जण एकत्र येतात त्यामुळे तो आनंदाचा क्षण जपण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. लग्न कार्यालयापर्यंत येण्यासाठी आजकाल सजवलेली कार असतेच असते. अगदी वाजत गाजत हा स्वागत समारंभ पार पाडला जातो.

मात्र या आधुनिकतेच्या काळात पारंपरिक गोष्टी मागे पडल्या आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर या शेतकरी पुत्राचे व-हाड तुम्ही बघाच. पुण्यातल्या भोर तालुक्यातील उत्रौली गावात एका शेतकरी पुत्राची एक आगळी वेगळी व-हाड पद्धत पाहायला मिळाली. या शेतकरी पुत्राने असे काही काम केलं आहे की ज्यामुळे त्याच सगळीकडून कौतुक होत आहे.

त्याने आपल्या लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाताना सजवलेल्या कार ने न जाता शेतकरी पुत्र पारंपरिक पद्धत जपत थेट बैलगाडीतून व-हाड घेऊन कार्यालयात पोहचला. त्यामुळे सध्या नवरदेव शुभम शिवतरे चर्चेचा विषय बनला आहे. बैलगाडीला अतिशय सुरेख पद्धतीने सजवण्यात आले होते. बैलगाडीची आकर्षक सजावट लोकांच्या आकर्षणाचा भाग बनला होता.

बैलगाडीतून वऱ्हाड्यासह कासरा हातात घेऊन बैलगाडीचे सारथ्य करत नवरदेव शुभम शिवतरे लग्न कार्यालयात पोहचला. सध्या सगळीकडे याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. खूप आधी लग्नाला जाताना वऱ्हाडासाठी बैलगाडीचा वापर करण्यात येत होता.

केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरू

आता आधुनिक काळात देखील याचा वापर वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात तर बैलगाडीचा हा ट्रेंड वाढलाच आहे. लग्नाला जाण्यासाठी आता वऱ्हाडी मंडळी पुन्हा एकदा बैलगाडीला पसंती देत आहेत. यातून पुन्हा एकदा जुन्या लुप्त झालेल्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:
आयआयटीत शिक्षण नंतर करोडोंची नोकरी सोडून धरली शेतीची वाट; वाचा यशस्वी जोडप्याची कहाणी
दुकानदारांनो शेतकऱ्यांना फसवत असाल तर सावधान; मंत्री सुनील केदार यांची मोठी घोषणा

English Summary: What do you say The wedding came from a bullock cart
Published on: 25 May 2022, 04:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)