राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सध्या त्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली तर अनेकदा महावितरणचे कार्यालय देखील जाळले. अनेक ठिकाणी कार्यालयाला कुलूप देखील लावले. असे असताना आता (Agricultural Policy) कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करीत आहे.
अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. असे असताना या योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्याचे प्रयत्न सुरु आहेत. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत उपविभागातील खेडेगाव, वरखेडा,चिंचखेड,पालखेड ,शिरवाडे वणी, कोकणगाव, साकोरा अशा 38 गावांमधून 70 ते 80 महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी मोटारसायकल रॅली काढून ग्राहकांचे प्रबोधन केले आहे.
योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्यासाठी सर्वकाही केले जात आहे. यामुळे आता तरी शेतकरी बिल भरणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या योजनेत सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे. शिवाय वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्याच फायदा आहे.
यामध्ये शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम भरून त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे. मात्र यामध्ये हवा तेवढा सहभाग अजूनही दिसत नाही. यामुळे महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. गावोगावी जाऊन महावितरणचे अधिकारी हे योजनेची माहिती देत आहेत. कर्मचारी हे योजनेत शेतकऱ्यांचा लाभ कसा हे पटवून दिले जात आहे.
आता निफाड तालुक्यात सध्या महावितरणचे कर्मचारी हे मोटारसायकलहून रॅली काढत जनजागृती करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही योजनेचे स्वरुप लक्षात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आता 11 दिवस उरले आहेत. शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन ठरविण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा..
बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक..
बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेत घुसले आणि...
Published on: 20 March 2022, 12:49 IST