कृषी पंप विज धोरण 2020 मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

11 December 2020 04:23 PM By: KJ Maharashtra

नवीन कृषी पंप विज धोरण 2020 अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीज बिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात येणार आहे. कृषी पंप विज धोरण 2020 संदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.

पुढे नितीन राऊत म्हणाले की कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देणे तसेच कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीज पुरवठा करणे, कृषी पंपा करिता पायाभूत सुविधा उभारणे आणि टप्प्याटप्प्याने सवलती देत थकबाकी वसूल करणे या बाबी प्रामुख्याने या धोरणात समाविष्ट आहेत. मार्च 2018 पूर्वीच्या वीज जोडणी प्राधान्य देऊन नव्याने वीजजोडणीसाठी आलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त अर्जानुसार वीजजोडणी देण्याचा शासन प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले. जर थकबाकीचा विचार केला तर कृषी क्षेत्राची सुमारे 40 हजार कोटी थकबाकी असून शासनाकडून 2012 पासून अनुदानात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ही थकबाकी वसूल करण्याच्या योजनेला तीन वर्षाची मुदत असून लघु व उच्च कापसे जलसिंचन योजनेचे सर्व ग्राहक योजनेत सहभागी होऊ शकते.

हेही वाचा:कुसुम योजनेअंतर्गत ठराविक रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप


जे शेतकरी सन 2015 पूर्वीची थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांचे विलंब शुल्क आणि व्याज पूर्णतः माफ करण्यात येणार असून केवळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा विलंब शुल्क माफ करत असताना व्याजदर सध्याच्या 18 टक्‍क्‍यांऐवजी आठ ते नऊ टक्के आकारण्यात येणार आहे अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने  वसूल करण्यात येणार आहे. तसेच या योजनेनुसार पहिल्या वर्षात तर बाकीचे जेवढे पैसे शेतकरी भरतील तेवढीच रक्कम त्यांना क्रेडिट देण्यात येणार आहे. नंतरच्या वर्षात भरलेल्या पैशाच्या 20% क्रेडिट देणार आहे. या सगळ्या थकबाकी तून मिळणाऱ्या शुल्कामधून ते 30 टक्के ग्रामपंचायतीला हद्दीतील विजेच्या पायाभूत सुविधा तसेच सेवा सुधारणेसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

electricity farmers electricity bills
English Summary: Big decision for farmers in Agriculture Pump Electricity Policy 2020

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.