नवी मुंबई: मित्रांनो चंद्रावर जीवनाचा शोध घेण्यासाठी तसेच तेथील भौगोलिक वातावरण जाणून घेण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या संस्था चंद्रावर मोहिमा काढत असतात. आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, चंद्र मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीवर आणलेल्या चंद्राच्या मातीत शास्त्रज्ञांनी वनस्पती उगवुन दाखवली आहे. शास्त्रज्ञांना चंद्राच्या मातीत वनस्पती उगवण्यात यश आल्यामुळे चंद्रावर शेती करता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर मानवी वस्ती स्थापित केली जाऊ शकते असा दावा केला जाऊ लागला आहे. यामुळे चंद्रावर मानव वस्ती बसवण्याच्या मानवी स्वप्नांना आशेचे पंख जोडले गेले आहेत. चंद्रावर शेती करता आली तर निश्चितच मानवाला अन्नधान्याची असलेली आवश्यकता पूर्ण करता येणार आहे शिवाय ऑक्सिजन देखील उपलब्ध होणार आहे.
भावा फक्त तुझीच हवा!! मुंबईचा उद्योजक गावी परतला अन शेती सुरु केली; आज कमवतोय वर्षाकाठी 20 लाख
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेने अनेक चंद्र मोहीमा चालवल्या आहेत. अपोलो या चंद्र मोहिमेद्वारे एकूण चौदा वेळा नासाने चंद्रावर भेट दिली आहे. या चंद्र मोहीमापैकी काही मोहिमा यशस्वी झाल्या असून काही यशस्वी देखील झाल्या आहेत. या चंद्र मोहिमाद्वारे नासाने चंद्रावरची माती पृथ्वीवर आणली होती. या मातीत शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून वनस्पती उगवण्यासाठी प्रयत्न करत होते.
मात्र शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांना याकामी यश आले आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चंद्राच्या मातीत पांढर्या फुलांच्या वनस्पतीची रोपे उगवण्याची किमया साधली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नासा या संस्थेने या शास्त्रज्ञांना केवळ बारा ग्राम माती उपलब्ध करून दिली होती आणि या शास्त्रज्ञांनी या एवढ्याच मातीत वनस्पती उगवून दाखवली आहे.
माती कमी असल्यामुळे शास्त्रज्ञांना अनेक संकटांचा सामना करावा लागला मात्र शास्त्रज्ञांनी या संकटांना तोंड देत थेल क्रेस नामक वनस्पती यशस्वीरित्या उगवून दाखवली आहे. मित्रांनो या प्रजातीतील वनस्पती आपल्यासाठी खाण्यालायक आहे. यामुळेच या वनस्पतीचा संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत पेरलेल्या या बियांना पाणी, खते आणि आवश्यक प्रकाश पुरवला. तुलना करण्यासाठी पृथ्वीवरील मातीच्या विविध नमुन्यांमध्येही या बियांची लागवड करण्यात आली.
या संशोधनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व नमुन्यांमधील बिया अंकुरल्या आणि त्यांना पालवी फुटली आहे. शास्त्रज्ञ अॅना पॉल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चंद्रावरील मातीत उगवलेली रोपे इतर मातींमधील रोपांच्या तुलनेत बुटकी होती. काही रोपांची वाढ देखील उशिराने झाली. म्हणजेच चंद्राच्या मातीशी जुळवून घेण्यात वनस्पतींना अडचणी येत आहेत.
मात्र, असे असले तरी परिस्थितीनुसार प्रत्येक सजीव आपल्यात बदल घडवण्यात सक्षम आहे. यामुळे चंद्राच्या मातीनुसार वनस्पती त्यानुसार बदल घडवतील, असा विश्वास पॉल यांनी व्यक्त केला. या संशोधनामुळे चंद्रावर शेती करण्यासाठी सकारात्मक चिन्हा बघायला मिळाले आहेत. यामुळे निश्चितच शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 14 May 2022, 11:12 IST