गडचिरोली येथे जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी तरुणी स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरली आहे.
ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी उसेगाव जंगल परिसरात घडली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाचा मृतदेह शोधण्यास दीड ते दोन तास शोध मोहीम राबवल्यानंतर मृतदेह गावकऱ्यांना सापडला.
अजित सोमेश्वर नाकाडे असं मृत पावलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन गडचिरोली येथीलजंगल परिसरात फिरायला गेला होता. जंगलात फिरत असताना दबा धरुन बसलेल्या वाघानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
वाघाने हल्ला करत अजितला जंगल परिसरात ओढत नेलं. त्यानंतर त्याच्या सोबत असणाऱ्या त्याच्या मैत्रिणीने त्या ठिकाणावरून पळ काढला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकरी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात अजितला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली. दीड ते दोन तास शोधाशोध केल्यानंतर अजितचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर जंगल परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी जंगल परिसरात अशाप्रकारे फिरू नये, कारण या ठिकाणी अनेक वन्य प्राण्यांचा वावर असतो, म्हणून अश्या पद्धतीने जंगलात फिरणे धोकादायक आहे. असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी दादांनो! मत्स्यशेती करा सुरु परंतु या जाती ठरतील संवर्धनासाठी फायदेशीर, करून घ्या माहिती
ऐकावे ते नवलंच! सकाळी-सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने 'हे' होतात जबराट फायदे; वाचून विश्वास बसणार नाही
Published on: 05 May 2022, 05:06 IST