सध्या ऊस दरासह उसाच्या वजनामध्ये काटामारीच्या आरोपामुळे चर्चा सुरू आहे. अनेक कारखान्यात काटामारी होते, असे म्हटले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यामुळे आंदोलन देखील केले आहे.
त्यावर पर्याय म्हणून शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी पेनुर येथे स्वखर्चातून वजन काटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून कुठल्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चवरे यांनी दिली.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी स्वागत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या वजनाबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.
बातमी कामाची! आता पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे २ हजार
मी शेतकरी आहे. जिल्हाप्रमुख नंतर. सध्या शेतकऱ्यांना एक टन उसापासून कारखानदारांना किती पैसे मिळतात याची माहिती झाली आहे. काटा मारण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. या सर्वांचा विचार करून मी काटा बसविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले.
आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, मापात पाप होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय..
दरम्यान, हा काटा पंढरपूर आळंदी या पालखी मार्गावरील पेनुर नजीक असणार आहे. त्याची 50 टन वजन क्षमता असून, त्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे राज्यात याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या;
सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांनी जमीन मंजूर, ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार..
शेतकऱ्यांना दिलासा!लम्पीमुमृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंची नुकसान भरपाई खात्यावर जमा
सोयाबीन, ऊस, हरभरा या पिकातील सुरवातीपासून तणांची चिंता संपली
Published on: 09 November 2022, 05:16 IST