शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही केल्याने संपत नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवायला लागल्या आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला (Rain) पोषक हवामान तयार झाले आहे.
यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यामध्ये पुढील 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उद्या (7 एप्रिल) गारपिट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
कर्जत जमखेडचा दुष्काळ हटणार! रोहित पवार यांच्या पुढाकाराने 43 गावांमध्ये काम सुरू...
राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे.
गेल्या 24 तासांत चंद्रपूर जिल्ह्यात देशातील उच्चांकी म्हणजेच 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची (Weather Update) नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा संकट आले आहे.
निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत, निवडणूक होणार नाही...
मोठी बातमी! देशात कोरोनाला आकडा वाढला, दिवसभरात 4 हजार रुग्ण, पुण्यात एकाचा मृत्यू...
निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत, निवडणूक होणार नाही...
Published on: 06 April 2023, 11:18 IST