आजकाल जगात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. यामुळे याचा फायदा आणि तोटा देखील आहे. सगळ्यांच्या हातात मोबाईल आले, मातीची घरे आता सिमेंटची झाली, चारचाकी गाड्या देखील अनेकांच्या दारात उभ्या राहिल्या.
सगळीकडे असे चित्र असताना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावापासून सहा किलोमीटरवर कुर्मग्राम वसलेले आहे. सुमारे साठ एकर परिसरात हे गाव वसलेले आहे.
या गावात ५६ घरे असून, ती सिमेंट आणि स्टील न वापरता उभारली आहेत. गावात कोणाकडेही कोणतेही आधुनिक उपकरण किंवा सोयीसुविधा नाहीत. यामुळे या गावाची नेहेमी चर्चा असते.
संपूर्ण गावात संपर्कासाठी केवळ एकच लँडलाइन फोन आहे. यामुळे फोनवर दिवसेंदिवस बसणारी पोरं या गावात नाहीत. गावात मातीचे घर अन् शेणाने सारवलेल्या भिंती आहेत. वीज नाही, मोबाइल, इंटरनेट नाही.
स्वयंपाकाचा गॅसही याठिकाणी नाही. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आपले पूर्वज जसे राहत होते, त्याच पद्धतीने हे गाव आज जगत आहे. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटेल.
आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा, शेतकरी चिंतेत..
अनेकांना वाटेल की गावात गरिबी आहे, पण असे नसून हा जीवनमार्ग येथील लोकांनी स्वीकारला आहे. कमी गरजा आणि साधी राहणी उच्च विचारसरणी असे सूत्र येथील लोकांनी स्वीकारले आहे.
महत्वाच्या बातम्या;
कर्जत- जामखेडमध्ये रोहित पवार की राम शिंदे? कार्यकर्त्यांने लावली 1 लाखाची पैज, चेकही केला जमा
भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आर्थिक अडचणीत
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला लागला मार
Published on: 04 January 2023, 02:37 IST