आपण आजपर्यंत रेशनच्या दुकानात धान्य आणायला जात होतो, आता मात्र याठिकाणी फळे आणि भाजीपाला देखील मिळणार आहे. सध्या ही सुविधा मुंबई आणि ठाणेकरांसाठीच उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात राज्यात सगळीकडे ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना रेशन दुकानांवर फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ज्या दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली त्यामध्ये पुण्याच्या शाश्वात कृषी विकास इंडिया आणि नाशिकच्या फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर या दोन कंपन्यांचा समावेश आहे. रेशन दुकानांचे उत्पादन वाढावे यासाठी भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे याला आता गती मिळणार आहे.
याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी संबंधित कंपन्यांना काही अटी देखील आहेत. रेशन दुकानाचे उत्पादन वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे. याचे पालन देखील करावे लागणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक
तसेच फळे आणि भाजीपाल्याचे कुठले उत्पादन विकावे याचे कंपनीवर बंधन नसल्याचे देखील शासन निर्णयामध्ये म्हटले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच रेशन दुकानात किराणा मालाची देखील विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे दर कसे असतील याची माहिती मात्र अजून पुढे आली नाही.
महत्वाच्या बातम्या;
शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..
मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..
Published on: 08 June 2022, 04:11 IST