जर तुम्ही पी एम किसान योजनेत नोंदणी केली असेल तर आज तुमचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्ट मध्ये आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे.
. यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकाचे आवश्यकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना चा अकरावा हप्ता आज जारी केला. यामध्ये सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांसाठी एकवीस हजार कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळी ट्रान्सफर केली जाईल.
हे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपण सहजपणेतपासू शकता की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही.आता नवीन नियमानुसार केवायसी केली नसेल तर पैसे थांबू शकतात किंवा आधार सीडिंग नसले तरी पैसे येणार नाहीत. पी एम किसान योजनेचे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही फक्ततुमचा बँक खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकूनतुमच्या खात्याची स्टेटस तपासू शकतात.
डिसेंबर ते मार्च पर्यंत सरकारने या योजनेच्या माध्यमातूनअकरा कोटी 11 लाख 87 हजार 269 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन-दोन हजार रुपये पाठवले आहेत.आपल्याला माहित आहेच कि या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे लागवड योग्य जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
तुम्हाला पैसे आले की नाही हे या पद्धतीने तपासा
1- सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करावे.
2-या संकेतस्थळाच्या होम पेजवर उजवीकडे फार्मर्स कॉर्नर हा पर्याय दिसतो.
3- या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटसया पर्यायावर क्लिक करावे.
4- यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकूनपैशांची स्थिती जाणून घेऊ शकता.
5- आम्ही फार्मर्स कॉर्नर येथे लाभार्थी यादी वर क्लिक करून त्यातील माहिती मिळवू शकता.
6- या ठिकाणी डॅशबोर्डवर तुम्हाला राज्य,तुमचा जिल्हा,तालुका आणि गाव निवडावे लागेल.
7- हे सगळे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक केल्यास तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल.
FTO असे दिसत असेल तर त्याचा अर्थ
तुम्ही पी एम किसान नोंदणी केली असेल तर आज तुमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत की नाही वरती सांगितलेल्या प्रोसेस प्रमाणे तपासा.
परंतु तुमच्या खात्याची स्टेटस तपासल्यावर त्यामध्ये FTO असे लिहिले असेल तर समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीत तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येतीलच.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Bima Ratna Policy: एलआयसीने लॉन्च केली विमारत्न पॉलिसी, जाणून घेऊ या पॉलिसीचे फायदे
Published on: 31 May 2022, 01:57 IST