News

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले या छोट्याश्या गावातील दत्तात्रय उगले पाटील हे अत्यंत अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी म्हणून गावामध्ये ओळखले जातात. गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावर त्यांनी पपई, केळी, आंबा, लिंबोनी, रामफळ, सीताफळ,आवळा व थोडेसे गुरांसाठी या पिकांची लागवड केली आहे.

Updated on 12 April, 2021 8:47 PM IST

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले या छोट्याश्या गावातील दत्तात्रय उगले पाटील हे अत्यंत अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी म्हणून गावामध्ये ओळखले जातात.

गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावर त्यांनी पपई, केळी, आंबा, लिंबोनी, रामफळ, सीताफळ,आवळा व थोडेसे गुरांसाठी या पिकांची लागवड केली आहे. पारंपरिक शेतीत बदल करीत त्यांनी ही फळं झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये उगले पाटिल यांनी २० गुंठे जाग्यामध्ये सीताफळ लागवड केली. यासह इतर एक एकरमध्ये त्यांनी पपई, आवळा, आंबे, केळी, लिंबोणी, चारापिके इत्यादी पिके त्यांनीं घेतली आहे. व दर्जेदार उत्पादन या वर्षी होइल असेही त्यांनी सांगितले. उगले पाटील यांच्या घडवलेल्या प्रयोगशील शेतीतून कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. शेतीतील यशाचे समाधान कुटुंबातील सदस्यांच्या व गावाच्या चेहऱ्यावर न दिसले तर नवल ते काय?

हेही वाचा : योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी

भाजीपाला उत्पादन


केळी आणि पपई या दोन झाडांच्या फट्टीत वेगवेगळ्या भाजीपाल्यांची उत्पादन ते घेत आहेत. त्यामधे गोबी, पालक,मेथी,कांदा, लसूण व इतर भाज्यांचे उत्पादन ते घेत आहेत. या शेतीविषयी बोलताना उगले म्हणाले की, शेतीत मेहनत आवश्‍यकच आहे. पण त्याच्या जोडीला नवे तंत्रज्ञान, अभ्यास यांची जोड द्यायला हवी, तरच शेती फायदेशीर होईल. अलीकडील काळात शेतमालाचे दर घसरले आहेत. परंतु योग्य नियोजन आणि उत्पादन खर्च कमी करावा लागेल अर्थातच सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करावी लागेल. गायी आणि बैल सोबत घेऊन शेती करावी लागेल ते शेतीचा खर्च कमी करतात असे मला वाटते.

 

पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये-


1) कमी जागेत जास्त उत्पादन
2) उत्पादन खर्च कमी
3) ठिबक सिंचनाचा वापर (पाण्याची बचत)
4) सेंद्रीय शेती
5) शेणखत व गोमुत्राचा वापर
6) जवळ पाण्याचा स्रोत नसल्याने लांबच्या विहरीवरून पाइपलाइन

मार्गदर्शन -


दत्तात्रय उगले पाटील यांचा नातू गोपाल नरसिंग उगले, कृषी महाविद्यालय अकोला येथे घेत असतानाच हा युवक उगले पाटील यांना व गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. गोपाल उगले याला शेती आवड आहे. त्यामधे विशेष सेंद्रिय शेतीची अधिक आवड त्याला असल्याने रासायनिक खतांचा व औषधांचा वापर न करता घराच्या घरीच शेती आपण पिकऊ शकतो असं तो सांगत आहे. व दत्तात्रय पाटलांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन मिळत आहे.

समाजसेवेची आवड

दत्तात्रय उगले पाटील यांना समाजसेवेची सुद्धा आवड आहे. पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा हौद तयार केला आहे व त्यामधे संपूर्ण गावातील शेतकर्यांचे गुरे पाणी पिण्यासाठी येतात. तब्बल 20 वर्षांपासून हा पाण्याचा हौद त्यांनी तयार केलेला आहे.

 

शेतीतील वाटचाल


सन 1966 च्या सुमारास पाटील यांनी शेती करायला सुरवात केली. भागातील मुख्य पारंपरिक पीक म्हणजे करत असताना त्यांनी आता आधुनिक शेती आणि सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करत आहेत..

प्रतिनिधी गोपाल उगले
मो- 9503537577

English Summary: Ugle Patil also planted various orchards in his wardha
Published on: 12 April 2021, 06:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)