Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. आता वर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तीन नावे दिली आहेत.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
त्याशिवाय त्यांनी पक्षासाठी तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिल्याचं सांगितलं. यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन चिन्हं दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निवडणूक आयोगानं लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
"शिवसेना तर अजिबात..!" सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया..
40 डोक्याच्या रावणानं प्रभू रामाचं शिवधनुष्य गोठवलं. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्या काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. त्यांना आनंदानं उकळ्या फुटत असतील.
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार
पण त्याही मागे त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असेल. बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवलं. कशीही माणसं काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही; मोठा निर्णय
Published on: 09 October 2022, 07:05 IST