केंद्र सरकारने नुकतेच एलपीजी गॅस वरदोनशे रुपये सबसिडी जाहीर केली होती.मात्र यावर आता केंद्र सरकारने स्पष्ट केले की,हे दोनशे रुपयांची सबसिडी केवळउज्वला योजने अंतर्गत मोफत कनेक्शन मिळवणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे.
बाकीच्या लोकांना बाजार भावाप्रमाणे एलपीजी खरेदी करावा लागेल. याबाबतीत तेल खात्याचे सचिव पंकज जैन यांनी सांगितले की, जून दोन हजार वीस पासून एलपीजी गॅस वर कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाहीआणि आता फक्त तीच सबसिडी दिली जाईल याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 21 मे रोजी केली होती.
नक्की वाचा:Study Tips:UPSC सिव्हिल सर्विस टॉपर श्रुती शर्मा यांची रणनीती आणि यशाचा मंत्र, नक्की वाचा
ते म्हणाले की कोरोना महामारी च्यासुरुवातीच्या दिवसांपासून एलपीजी ग्राहकांसाठी कोणतीही सबसिडी नव्हती.त्यावेळेसच उज्वला लाभार्थ्यांसाठी ही सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.
महागाई कमी करण्याच्या उद्देशाने 31 मे रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर आठशे रुपये आणि डिझेलवर सहा रुपये प्रति लिटर ने कमी करण्याची घोषणा केली होती व त्यासोबत उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 सिलिंडर साठी प्रति सिलेंडर दोनशे रुपये सबसिडी देण्याची गोष्ट त्यांनी केली.
उज्वला लाभार्थ्यांना दोनशे रुपयांची गॅस सबसिडी देण्यासाठी सरकारला सहा हजार शंभर कोटी रुपये खर्च करावे लागतील असे देखील निर्मला सीताराम यांनी त्या वेळी सांगितले.
एका अहवालानुसार सध्या देशामध्ये 30.5कोटी एलपीजी कनेक्शन असून त्यापैकी नऊ कोटी कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत देण्यात आले आहेत.यानुसार आता दिल्लीचा विचार केला तरएलपीजी सिलिंडरची किंमत एक हजार तीन रुपये आहे.प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट दोनशे रुपये सबसिडी मिळेल आणि त्यांच्यासाठी ही किंमत 803 रुपये प्रति सिलिंडर वर येईल. परंतु दिल्लीतील उर्वरित ग्राहकांसाठी ती किंमत एक हजार तीन रुपये असेल.
Published on: 03 June 2022, 12:44 IST