आपण बघतो की राजकारण म्हटलं की कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा यामध्ये अनेकांचे जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना आता पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या दोन गटात हिंसक झडप झाली. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर बॉम्ब फेकले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.
अनेकदा युद्ध झालं किंवा देशाच्या सीमेवर इतर काही गोष्टी झाल्या तर बॉम्ब हल्ले होतात, मात्र आता आपल्या देशातच असे झाले तर मात्र परिस्थिती अवघड होणार आहे. याठिकाणी पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यात दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुगळीच्या आरामबाग परिसरात हा हिंसाचार झाला आहे.
तसेच या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. त्यानंतर एकमेकांवर बॉम्ब फेकण्यास सुरुवात झाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर राखीव पोलीस तुकड्या तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंसाचारातील एक गट हा माजी आमदार कृष्णा चंद्र यांचा होता तर दुसरा गट हा युवा अध्यक्ष पलाश रॉय यांचा होता. उपस्थित लोकांनी याबाबत माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस करणार परतफेड? अजितदादांसाठी 'ती' जागा सोडण्याची शक्यता..
कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शहीद दिवस' कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यकर्ते परतले होते. आरामबाग इथे आल्यानंतर दोन्ही गटात हिंसाचाराला सुरुवात झाली होती. यावेळी हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह 3 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण आधीच तणावाचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया
अमित शहांच्या सहकार मंत्राल्यास शरद पवार करणार मार्गदर्शन, सरकार मंत्रालयाने केलेली विनंती
एफआरपीचे 31 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
Published on: 22 July 2022, 11:35 IST