News

काही महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड करत मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला होता. तसेच भाजपकडून त्यांना अजून काही आश्वासने देण्यात आली होती.

Updated on 16 November, 2022 12:39 PM IST

काही महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड करत मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला होता. तसेच भाजपकडून त्यांना अजून काही आश्वासने देण्यात आली होती.

शिंदे गटाला भाजपने दोन राज्यपालपदे आणि केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे देण्याचे ठरविले आहे. यामुळे आता यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळातील ५० टक्के मंत्रिपदे देण्याची मागणी केली होती.

ती मागणी मान्य करण्यात आली आहे. आता दोन राज्यांचे राज्यपालपद आणि केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. ती मागणीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केली आहे. यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्षाला रामराम, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का

यामध्ये लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे तसेच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच दोन राज्यपालपदेही शिंदे गटाला मिळणार आहेत. यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत.

पालकांनो लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर ही बातमी वाचाच..

यासाठी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नावे चर्चेत होती. मात्र रामदास कदम यांनी राज्यपालपद घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आता याठिकाणी कोणाची वर्णी लागेल हे लवकरच समजेल. गुजरात निवडणुकीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
LIC Jeevan Shiromani: 4 वर्षांच्या गुंतवणुकीत 1 कोटीपर्यंतचा फॅट फंड, जाणून घ्या सविस्तर..
देशातील गव्हाचा साठा आला निम्म्यावर, दर वाढण्याची शक्यता..
टोमॅटोचे दर घसरले, खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत

English Summary: Two Governorships two Union Ministerships! Shinde group
Published on: 16 November 2022, 12:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)