News

राज्यातील राजकारण एक मोठी घडामोड घडली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली.

Updated on 02 August, 2022 1:52 PM IST

राज्यातील राजकारण एक मोठी घडामोड घडली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली.

दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. असे असताना आता खासदार जया बच्चन यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगितले गेले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, यामुळे आता शिवसेना आक्रमक झाली आहे. तसेच आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत. ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी दिली. यामुळे आता ईडीविरोधात शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनो आता जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये मिळणार, असा घ्या लाभ...

गेल्या काही दिवसांपासून राऊत हे भाजपवर निशाणा साधत होते. तसेच मोदींवर देखील त्यांनी टीका केली, यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही घोटाळ्याची संबंध नाही. मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही. मरेन, पण शरण जाणार नाही. खोटे आरोप, खोटी कागदपत्रे दाखवून कारवाई केली जात आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

अमेरिकेने बदला घेतलाच! लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदाची सूत्रे हातात घेणारा अल जवाहिरीला केले ठार

दरम्यान, ईडीचा हा अशाप्रकारे सुरु असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते', असे जया बच्चन यांना विचारण्यात आले. त्यावर जया बच्चन यांनी २०२४ पर्यंत, असे उत्तर दिले यामुळे त्यांनी या प्रश्नावर संतप्त उत्तर दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ईडीविरोधात अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
२०२४ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? अमित शहांनी केली 'या' बड्या नावाची घोषणा..
आगीतून उठून फुफुट्यात! पेट्रोल परवडत नाही म्हणून CNG गाडी घेतली, आणि CNG ११६ वर गेला.
बातमी शेतकऱ्यांसाठी! म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

English Summary: 'Troubled only for 11 lakhs'
Published on: 02 August 2022, 01:34 IST