News

वंजारवाडी येथील शामगांव खिंड, पारगाव, गोरेगांव, पुसेसावळी, गणेशवाडी, औंध असा असलेला राज्य मार्ग पुसेसावळी येथील रस्त्यालगत नांगरण्यात आला आहे. यामुळे याचे कारण काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Updated on 09 January, 2023 5:48 PM IST

वंजारवाडी येथील शामगांव खिंड, पारगाव, गोरेगांव, पुसेसावळी, गणेशवाडी, औंध असा असलेला राज्य मार्ग पुसेसावळी येथील रस्त्यालगत नांगरण्यात आला आहे. यामुळे याचे कारण काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

याबाबत माहिती अशी की, मी रिटायर बीडीओ, मुलगा वकील त्यामुळे मी सगळा डांबरी रस्ता उकरू शकतो, असे म्हणत राज्य मार्ग 143 ट्रॅक्टरने नांगरला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गावातीलच शेतकरी श्रीरंग दादू खोत आणि ट्रॅक्टर मालक रमेश लक्ष्मण खोत यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली आहे.

या रस्त्यावर असलेली नंबरी दगडेही ट्रॅक्टरच्या सहाय्याने हलवली आहेत. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना संपूर्ण रस्ता नांगरला तरीही माझं कोणीच काही करू शकत नाही. मी स्वतः सेवानिवृत्त बीडीओ असल्याने मला कायदा माहिती आहे, असे सांगितले.

दौंडमध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन, 2 लाख शेतकरी देणार भेट

दरम्यान, आता ग्रामस्थ आक्रमक झाले, असून संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत कारवाई न झाल्यास तहसील कार्यालय खटाव समोर आत्मदहन करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

नेहेमी पैस देऊन जाणारे पीक म्हणजे अननस! अननसाची लागवड तंत्र जाणून घ्या..

दरम्यान, रस्त्यांचे नुकसाना करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या;
... तर शेतकरी आत्महत्या करणार नाही! बळीराजा आहे सर्वांचे भविष्य...
प्रक्रिया उद्योगांमध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर; भविष्यात मका लागवड ठरेल फायदेशीर
रंगीबेरंगी फुलकोबीच्या लागवडीत नफाच नफा, बदलणार शेतकऱ्यांचे नशीब!

English Summary: tractor plowed state road had been built threatening BDO lawyer
Published on: 09 January 2023, 05:48 IST