लासलगाव म्हणजे कांद्याची नगरी म्हणायला हरकत नाही मात्र लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो चे भाव खूप कोसळले आहेत.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० हजार ५०० कॅरेट्स टोमॅटो ची आवक झालेली होती मात्र तेथे टोमॅटो ला प्रति किलो ३ ते ५ रुपये भाव मिळाला असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्ग जरा संकटात अडकलेला दिसत आहे.
देशांतर्गत मागणी घटली:
टोमॅटो उत्पादक शेतकरी(farmer) वर्गाला परदेशात टोमॅटो ची जास्तीत जास्त निर्यात कशी करता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. लासलगाव मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून पतपुरवठा केलेला आहे.नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद तसेच राजस्थान, बंगळूर व गुजरात मध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटो ची आवक होते मात्र देशात मोठ्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे आणि मागील तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने याचा थेट परिणाम टोमॅटो च्या दरावर झाला आहे. लासलगाव, पिंपळगाव तसेच बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीमध्ये टोमॅटो च्या २० किलो कॅरेट्स ला ६० ते १०० दर भेटत आहे म्हणजे प्रति किलो टोमॅटो चा भाव ३ ते ५ रुपये किलो आहे आणि याच कमी दरामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप दिसत आहे जसे की टोमॅटो लागवडीसाठी आलेला खर्च तसेच वाहतूक आणि मार्केट मध्ये उतरता भाव बघून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झालेली आहे.
हेही वाचा:खवय्यांना मिळणार आता जिवंत मासे, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नक्की आहे तरी कसली?
केंद्राकडं पाठपुरावा सुरु:
जास्तीत जास्त टोमॅटो ची निर्यात राज्यासह परदेशात कशी करता येईल अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरवठा केला आहे जे की पाकिस्तान, बांग्लादेश या आखाती देशात टोमॅटो ची निर्यात जास्त करता येईल.
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे टोमॅटो चे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. लासलगाव येथील मरळगोई गावातील टोमॅटो उत्पादक शेतकरी योगेश पवार यांनी अर्ध्या एकरात टोमॅटो ची लागवड केलेली होती त्यास त्यांना ५० ते ६० हजार रुपये खर्च आला.ज्यावेळी ते बाजार समितीत सव्वाशे कॅरेट्स घेऊन गेले त्यावेळी त्यांना एका कॅरेट्स ला ५० ते ६० रुपये भाव मिळाला त्यामुळे त्यांना लागवडीसाठी लागलेला खर्च तसेच वाहतूक व मजुरी या सर्वाचा खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे अशी व्यथा त्यांनी मांडलेली आहे.
Published on: 24 August 2021, 06:20 IST