काही दिवसांपासून श्रीलंकेत मोठी आर्थिक परिस्थिती उदभवली आहे, आता पाकिस्तानातील पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लाहोरमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून टोमॅटोचा भाव येथे 500 रुपये किलोवर पोहोचला आहे. पुरामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर दुकानदारांनी मनमानी किंमती निश्चित केल्या आहेत. कांदा 300 रुपये किलो आणि लिंबू 400 रुपये किलोने विकला जात आहे.
टोमॅटोची किंमत 80 रुपये प्रति किलो या सरकारी दरापेक्षा किमान सहा पटीने जास्त आहे, तर कांदे 61 रुपये किलो या सरकारी दराच्या पाच पटीने विकले जात आहे. त्यामुळं पाकिस्तानात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळं पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात त्वरित सुरु करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीनं केली आहे.
भारतानं तातडीनं निर्यात सुरु करुन भारतातील कांदा आणि टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी केली केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. यामुळे हा निर्णय झाला तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील.
दिल्लीचा ऐतिहासिक राजपथ आता होणार 'कर्तव्यपथ', मोदी सरकार नाव बदलणार..
पाकिस्तानमध्ये आता 250 किंवा 300 रुपयांना विकला जात आहे. अचानक आलेल्या पूर आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्यांनी पाकिस्तानमध्ये नासधूस केली आहे, प्राथमिक अंदाजानुसार देशाचे आधीच $5.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे, यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कापूस पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत तर कांदा, टोमॅटो आणि खरीप मिरचीचे अंशतः नुकसान झाले आहे.
'अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह'
एकट्या कापूस पिकांचे 2.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची कापड आणि साखर निर्यात एक अब्ज डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सिंधमधील सरकारी गोदामांमध्ये साठवलेला किमान 20 लाख टन गहू पाऊस आणि पुरामुळे खराब झाला असून त्यामुळे देशाच्या अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
अपात्र असल्याचे सांगून देखील मोदींचे २ हजार रुपये राजू शेट्टी यांच्या खात्यावर, शेट्टी म्हणाले, गौडबंगाल आहे..
पुणे जिल्ह्यातही वाढला संसर्ग! दुधाचे दर वाढले आणि लम्पीच्या संसर्गही वाढला, दुग्ध उत्पादनामध्ये झाली घट..
शेतकऱ्यांनी दाखवला पीक विमा कंपनीला हिसका! पीक विमा भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Published on: 06 September 2022, 05:34 IST