News

महाराष्ट्र राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात अडकलेले दिसून येत आहेत कारण टोमॅटो ला कसलाच भाव भेटेना त्यामुळे औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आपल्या टोमॅटो च्या ट्रॉली रस्त्यावर उधळून टाकत आहेत. येवला मधील एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने सुद्धा आपल्या मालाला काडीमात्र भाव नसल्याने काल टोमॅटो ची ट्रॉली रस्त्यावर टाकून दिली.

Updated on 26 August, 2021 6:42 PM IST

महाराष्ट्र राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात अडकलेले दिसून येत आहेत कारण टोमॅटो ला कसलाच भाव भेटेना त्यामुळे औरंगाबाद  व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आपल्या टोमॅटो च्या ट्रॉली रस्त्यावर उधळून टाकत आहेत. येवला मधील एका  टोमॅटो  उत्पादक  शेतकऱ्याने  सुद्धा  आपल्या मालाला काडीमात्र भाव नसल्याने काल टोमॅटो ची ट्रॉली रस्त्यावर टाकून दिली.

नाशिकमध्ये बाजार समितीत टोमॅटो फेकले:-

नाशिक मधील बाजारापेठेत शेतकरी टोमॅटो चे भाव घसरल्यामुळे आपली टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे असे चित्र  आपल्याला  पाहायला  भेटत आहे.  भाव नसल्यामुळे टोमॅटो (tomato)उत्पादक शेतकरी आपली टोमॅटो बाजार समितीच्या आवारातच फेकून देत आहेत.शेतकरी वर्गाने  आणलेला  टोमॅटो चा   माल बाजार समितीत फेकून दिलेला दिसत आहे जे की सगळ्या बाजार समितीत लाल चिखल दिसत आहे. संदीप जगताप हे तरुण शेतकरी सांगतात की पहिल्यांदा भाजीपाल्याचा भाव घसरतात दिसला होता मात्र अत्ता टोमॅटो चे भाव कमी असल्याने शेतकरी वर्गात संताप झालेला आहे.

हेही वाचा:FRP मध्ये वाढ करून शेतकऱ्यांना दिली सरकारने आनंददायी बातमी

औरंगाबादमध्येही शेतकरी आक्रमक:-

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मध्ये मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटो ची ट्रॉली रस्त्यावर उधळून टाकण्याचा व्हिडिओ वायरल झालेला होता जे की टोमॅटो चे भाव दिवसेंदिवस घसरत चालले असल्यामुळे तेथील शेतकरी आत्ता औरंगाबाद  मुंबई  हायवे वर  आक्रमक  झालेले  आहेत.जे की रस्त्यावर  तीव्र  आंदोलन  करत असल्याचे चित्र समोर आले आहे. लासुर स्टेशन येथे सुद्धा शेतकरी आक्रमक झालेले आहेत.औरंगाबाद  मुंबई हायवर सध्या जाम आहे आणि  तिथे  आंदोलन सुरू आहे.

देशांतर्गत मागणी घटली:-

नाशिक, नगर, औरंगाबादसह तसेच गुजरात, राजस्थान, बंगळूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टोमॅटो ची आवक झाली आहे मात्र देशांतर्गत मागणी घटल्यामुळे टोमॅटो च्या भावाची घसरण झालो आहे. मागील तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्यामुळे यांचा थेट परिणाम टोमॅटो च्या दरावर झालेला आहे.-येवला तालुक्यातील आदित्य जाधव याने आपल्या एक एकर क्षेत्रात ८० हजार पेक्षा जास्त खर्च करून टोमॅटो ची बाग लावली मात्र टोमॅटो चा भाव घसरल्यामुळे त्याने सुद्धा रस्त्यावर टोमॅटो ची ट्रॉली टाकून दिली. जे की ८० हजार मधून फक्त त्याच्या हाती १५ हजार रुपये राहिले त्यामुळे शेतकरी वर्ग खूप संकटात आहे.

English Summary: Tomato growers found themselves in crisis, all the red mud on the streets due to lack of price hike
Published on: 26 August 2021, 06:41 IST