News

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आज सकाळी 10 वाजता संबोधित करतील. त्यांचे भाषण पूर्वनिर्धारित नव्हते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती सामायिक केली आहे . आरबीआयच्या म्हणण्यानुसार, शशिकांत दास आज सकाळी 10 वाजता भाषण करतील.

Updated on 05 May, 2021 8:55 AM IST

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर(RBI) आज सकाळी 10 वाजता संबोधित करतील. त्यांचे भाषण पूर्वनिर्धारित नव्हते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती सामायिक केली आहे . आरबीआयच्या म्हणण्यानुसार, शशिकांत दास आज सकाळी 10 वाजता भाषण करतील.

आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष:

देश सध्या कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेपासून झगडत असताना . वेगवेगळ्या राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योगांवर वाईट परिणाम झाले आहेत. अशा परिस्थितीत आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास काही मोठे घोषित करू शकतात अशी आशा व्यक्त केली जात आहे.यामुळे बँकिंग सेक्टर तसेच लहान आणि मोठ्या व्यवसाय यांना थोडी राहत मिळेल कारण काही राज्यात LOCKDOWN झाल्यामुळे अनेक संकटाना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा:स्टेट बॅंकेत खाते असेल तर पटकन करा ही कामे, अन्यथा पैसे काढू शकणार नाहीत

भारतात मंगळवारी अवघ्या एका दिवसात ३ लाख ८२ हजारांहून अधिक कोरोना बाधित प्रकरणे नोंदली गेली आणि ती सोमवारीपेक्षा जवळपास २८ हजारअधिक कोरोना केसेस आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोविड -१९ मधील केसेसने २ कोटींचा आकडा ओलांडला आहे आणि अवघ्या १५ दिवसांत ५० लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून LOCKDOWN काही राज्यात लावण्यात आले आहे आणि याचा मोठा परिणाम लहान व्यवसायांवर होत आहे आणि ट्रान्सपोर्ट मध्येही खूप मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे RBI गव्हर्नर आज संबोधन करतील यामुळे यातील काही चिंता दूर होतील असे वाटत आहे.

English Summary: Today, RBI Governor Shashikant Das will deliver a speech, likely to make some big announcements
Published on: 05 May 2021, 08:55 IST