सहकार चळवळ ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी चळवळ असून या चळवळीला शंभर वर्षापासूनमोठा इतिहास आहे.तसेच सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे अर्थकारण आणि विकास होण्यासाठी खूप मोठी मदत झाली आहे.
बँकांचे कार्यक्षेत्र आता वाढली असून सहकारी बँका तसेच नागरी बँकाव पतसंस्थांकडे रिझर्व बँकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक चांगला असायला पाहिजे.नितीन गडकरीयांच्याप्रमाणेच केंद्र सरकारमधील सर्वांनी विकास कामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल. तसेच सहकार क्षेत्र अधिक व्यापक पद्धतीने वाढविण्यासाठी सर्वांनीच व्यापक होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी नांदेड येथे व्यक्त केले.नांदेड शहरात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी च्या सहकार सूर्य मुख्यालयाचे उद्घाटन शनिवारीसकाळी दहा वाजताराष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.या कार्यक्रमालाकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी ऑनलाईनमाध्यमातून उपस्थित होते.
सहकार क्षेत्रासंबंधी मांडलेले मत(Opinion Of Sharad Pawar)
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की साखरेसह साखर कारखान्यांनी इतर उत्पादनेसुरु केली असून आता सोयाबीन व हळद या पिकांकडे लक्ष दिले पाहिजे.त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करून यांचेही उत्पादन व त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी चालना दिली पाहिजेव तसेच शेतकरी व तरुण,महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची मदत होणार आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात नेतृत्व करणार्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणार यांनी देखीलते कर्ज व्याजासह वेळेत परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे,ख
तरच सहकार क्षेत्राला बळकटी येईल.सोबतच धनंजय मुंडे यांनी गोदावरी अर्बन चा विस्तार महाराष्ट्रसह तेलंगणा,आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि विशेष म्हणजे गुजरात राज्यात होतो ही अभिमानास्पद बाब आहे.
तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षा राजश्री पाटील यांचे देखील कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या
Published on: 14 May 2022, 06:42 IST