शेतामध्ये(FARM) मजूर काम करत असतात पण त्याचबरोबर ते मनोरंजनाचा सुद्धा आस्वाद घेत असतात आणि ही प्रथा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे पण अचानक दिवस बदलायला लागले आणि प्राचीन काळ हरपला गेला कारण नंतर मनोरंजन बंद पडले.सध्याचे कलयुग म्हणजे आधुनिक कलयुग, डिजिटल कलयुग म्हणायला काय हरकत नाही जे की सध्या शेतामध्ये डीजे(DJ) लावून गाण्यांच्या तालावर मजूर रोवणी करत दिसत आहे आणि या आधुनिक प्रयोग विनोद शर्मा यांनी केलेला आह जे की विनोद शर्मा कोटगाव येथे राहतात.
अनेक पिकांची लागवड सुद्धा केलेली आहे:
विनोद शर्मा यांचा चिमुद येथे कापड व्यवसाय आहे एवढेच नाही तर कोटगाव मध्ये विनोद शर्मा त्यांच्या मित्राची पडीक जमीन करतात.विनोद शर्मा यांनी सध्या भाताची रोवणी केली असून त्यांनी मिरची तसेच तूर या पिकाची लागवड सुद्धा केलेली आहे. मित्राची शेती पडीक राहण्यापेक्षा आपण त्यामध्ये काही तरी करू असे म्हणत त्यांनी त्या शेतीत मिरची, तूर इ. पिकाचे उत्पादन घेत आहेत.त्या शेताच्या अगदी शेजारून नदी सुद्धा वाहत आहे आणि शेतात विहीर आणि बोअरवेल असल्याने सुद्धा शेतील पाण्याची कमी नाही.
हेही वाचा:यूपीएल आता करतय भारताच्या कृषी सेवा बाजारात प्रवेश
शेतामध्ये जेव्हा महिला मजूर काम करत असतात त्यावेळी त्या प्राचीन गाणी गुणगुणत असतात पण ती अत्ता कालबाह्य झाल्यामुळे विनोद शर्मा यांनी चक्क त्यांच्या शेतामध्ये डीजे च लावलेला आहे.त्यांच्या या प्रयोगातून कोरोना काळामध्ये तेथील मजुरांच मनोरंज झाले तसेच शेतात काम करण्याचा त्यांचा उत्साह सुद्धा वाढला. अगदी गाणे ऐकून आनंदमयी वातावरण झाले आणि याच आनंद महिला मजुरांनी चांगल्या प्रकारे घेतला.रोवणी झाल्यानंतर काही ठिकानी शेतकरी उसळ चिवडा देत असतात परंतु विनोद शर्मा यांनी ते न करता चांगल्या प्रकारे मजुरांना जेवण दिले.
डीजेच्या आवाजामुळे वन्यप्राण्यांचीही भीती नाही:-
तुम्हाला माहीतच आहे की शेतामध्ये पीक दिसले की वन्यप्राणी शेतामध्ये धुमाकूळ घालत असतात जे की या काळात वाघ, रानडुक्कर, अस्वल यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाले तर काही लोकांचे या हल्ल्यामध्ये जीव सुद्धा गेले.आणि बहुदा या काही कारणांमुळे शेतकरी शेतात जायला घाबरू लागले त्यामुळे विनोद शर्मा यांनी डीजे लावून रोवणी केली आणि त्या डीजे च्या आवाजाने वन्यप्राणी आजिबात शेतीकडे फिरकले नाहीत आणि मजूर सुद्धा आनंदात काम करू लागले.विनोद शर्मा यांनी शेतामध्ये डीजे लावल्यामुळे महिला मजूर अगदी सकाळपासून ते संध्याकाळी पर्यंत अगदी आनंदात रोवणी करत होत्या त्यामुळे त्यांना सुद्धा थकवा जाणवला नाही आणि मनोरंजन सुध्दा झाले. प्राचीन गाणी बंद झाल्यामुळे अत्ता शेतामध्ये आधुनिक गाणी आणि सोबत डीजे चा प्रयोग अवलंबला.
Published on: 09 August 2021, 07:25 IST