News

Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि कमी बाजारभावाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूरमधील एका शेतकऱ्याने त्याच्या १० एकर द्राक्ष बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

Updated on 24 August, 2022 5:10 PM IST

Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती (natural disaster) आणि कमी बाजारभावाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूरमधील (Solapur) एका शेतकऱ्याने त्याच्या १० एकर द्राक्ष बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे बागायतदारांची अवस्था सामान्य बागायतदारांपेक्षा वाईट झाली असून, द्राक्ष लागवडीमुळेच (Grape cultivation) त्यांचे नुकसान होत असल्याचे सुरेश गायकवाड म्हणाले. खर्चही निघू शकला नाही म्हणूनच त्यांना बाग उध्वस्त करणे योग्य वाटले. महाराष्ट्रातील शेतकरी यंदा निसर्गाच्या कोपाने तर कधी कवडीमोल भावाने हैराण झाला आहे.

खर्चही काढणे अवघड होते

प्रत्येक शेतकऱ्याला फळबागेतून (Orchard) चार पैसे मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुरेश गायकवाड यांनीही पीक पद्धतीत बदल करून 10 एकरात द्राक्षांची लागवड केली होती.

Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...

त्यानंतर त्यांनी सलग दोन वर्षे उत्पादनही घेतले, मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अनियमिततेमुळे उत्पादनात घट होत आहे. दुसरीकडे औषधांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कारण 10 एकर द्राक्षबागेतून कर्जाचा डोंगर वाढत होता.

ट्रॅक्टरने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली

गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष पीक खराब होत होते. त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव वेगळाच त्रास देत होता. पीक तयार झाल्यावर ते कवडीमोल भावाने विकावे लागले. त्यामुळे द्राक्षाऐवजी इतर पिकांचे उत्पादन अधिक फायदेशीर असल्याचे गायकवाड यांना वाटले. एवढेच नाही तर यावर्षीही अतिवृष्टीमुळे उत्पादनाची हमी नाही.

धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी द्राक्षबागा तोडण्याचा निर्णय घेतला. अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाग उद्ध्वस्त केली. निसर्गाची अनिश्चितता आणि बाजारातील घसरलेले भाव या दोन्हीचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता हंगामी पिकांच्या लागवडीवर भर देणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

याआधीही महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्याने ट्रॅक्टर चालवून पिकांची नासाडी केली आहे. मात्र, सरकारने कोणतीही मदत केली नाही. खर्चानुसार भाव मिळण्याची हमी असेल, तर अशी परिस्थिती येणार नाही, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या:
Onion Price: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी! शेतकरी आक्रमक; सरकारकडे केली ही मागणी..
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास...

English Summary: Tired of cultivating grapes, farmer turned tractor 10-acre garden
Published on: 24 August 2022, 05:10 IST