News

अवकाळी, गारपीट आणि निसर्गाचा लहरीपणा याचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नियमित सामना करावा लागतो. या संकटांचा सामना करत पीक हातातोंडाशी आल्यावर राजकारण आणि भांडवलदार यांच्या सोयीने पिकाला मिळणारा भाव निश्चित होतो.

Updated on 24 February, 2022 4:04 PM IST

अवकाळी, गारपीट आणि निसर्गाचा लहरीपणा याचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नियमित सामना करावा लागतो. या संकटांचा सामना करत पीक हातातोंडाशी आल्यावर राजकारण आणि भांडवलदार यांच्या सोयीने पिकाला मिळणारा भाव निश्चित होतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात ठिकठिकाणी खोडसाळपणे ऊस पेटवून देण्याच्या घटनांनी अनेक शेतकरी उध्वस्त झाले. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः ऊस पेटवून देण्याची भावना मनात निर्माण होत आहे.

करमाळा तालुक्यात अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून एक एकर ऊस तोडण्यासाठी वाहन मालक येथील पंधरा हजार रुपयांची मागणी करत आहेत. ऐन ऊस गाळप महत्वाचे असताना अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने या प्रकाराला कंटाळून काही शेतकरी ऊस पेटवून देत आहेत. या नुकसानीची जबाबदारी आदिनाथ चे संचालक मंडळ घेणार का असा सवाल बळीराजा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकत्रित मिळून केला आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडा आणि करा जेरेनियमची लागवड; डोळे झाकून कमवा ५ लाख

बळीराजाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा सुपनर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना राजकीय गटबाजी मुळे बंद पडला आहे. हा कारखाना बंद पाडून स्वतःच्या खाजगी कारखान्यांना ऊस मिळवायचा या दृष्ट भावनेतून खाजगी साखर कारखानदारांनी हा कारखाना सत्ताधार्यांना हाताशी धरून बंद पडला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला.

हेही वाचा : सोयाबीनला उच्चांकी भाव; शेतकरी सुखावला

English Summary: Time to burn sugarcane on sugarcane growers
Published on: 24 February 2022, 04:04 IST