कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा २ मे रोजी नाशिक येथे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यातील १९८ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यापैकी तीन पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
कृषी पुरस्कार मिळालेल्या तीन शेतकऱ्यांनी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर गावातील समीर डोंबे या तरुण शेतकऱ्याला वंसतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाला आहे. त्या पुरस्काराची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे.
सध्या माझ्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज जास्त आहे. यातून समाजात चांगला संदेश जावा यासाठी मी बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे, असे समीर डोंबे यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले. मी ज्या क्षेत्रातून आलो आहे, त्या क्षेत्राचे काहीतरी देणे लागतो. मी नोकरी सोडून शेती करू लागलो. या क्षेत्रातून पैसा आला, कीर्ती आली. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार म्हणून हा निर्णय घेण्यात आला. समीर डोंबे यांना अंजीर उत्पादनातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत. आमच्याकडे एक चांगले उत्पादन होते. आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. माझ्याकडे डाळिंब आणि शेवग्याची बाग आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सातमाने गावातील पुरस्कार प्राप्त शेतकरी विनोद जाधव यांनी चांगल्या कामात हातभार लावावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही रक्कम देत असल्याची माहिती दिली.
विनोद जाधव यांना वंसतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव येथील शेतकरी प्रल्हाद गवारे यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बक्षिसाची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे.
महत्वाच्या बातम्या
दुसऱ्याकडून घेत जावे! परंतु द्यायच्या वेळेस दाम दुप्पट प्रमाणात द्यावे, हेच तत्व असे पीक आणि निसर्गाचे परंतु मानवाचे नव्हे!
Mansoon 2022: मान्सून लवकर येण्याच्या बातम्या फसव्या; हवामान तज्ञानेचं केला खुलासा
Published on: 09 May 2022, 09:57 IST