News

शेतीमध्ये शेतकरी विविध पिके घेतात. परंतु या पिकांचा बाजार भावाचा जर विचार केला तर त्यामध्ये सातत्याने चढ-उतार चालू असतो.

Updated on 04 April, 2022 11:39 AM IST

 शेतीमध्ये शेतकरी विविध पिके घेतात. परंतु या पिकांचा बाजार भावाचा जर विचार केला तर त्यामध्ये सातत्याने चढ-उतार  चालू असतो.

याला मागणी व पुरवठ्याचे प्रमाण तसेच बाजारपेठेच्या स्थिती इत्यादी गोष्टी कारणीभूत असतात असे म्हणता येईल. परंतु या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांची मनस्थिती अशी असते की, जर एखाद्या वर्षी एखाद्या पिकाला व्यवस्थित दर नाही मिळाले, शेतकरी पुढच्या वर्षी संबंधित पिकाची लागवड करणे टाळतो आणि नेमके याच वेळेस संबंधित पिकाचे भाव वाढतात. हीच परिस्थिती यावर्षी कलिंगडच्या बाबतीत दिसून आली. एखाद्या वर्षी नुकसान झाल्यानंतर जर हिम्मत केल्यास पुन्हा लागवड केली तर एखाद्या पीक किती फायदा देऊ शकते याचे प्रत्यंतर सध्या कलिंगड उत्पादक शेतकरी घेत आहेत.

नक्की वाचा:मोफत रेशन! 6 महिन्यांसाठी मोफत रेशनची घोषणा, मोबाईल OTP वरून मिळवा रेशन..

 मागच्या वर्षी कलिंगड पिकाची परिस्थिती

 मागच्या वर्षी कोरोना मुळे लोक डाऊन लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. कलिंगड उत्पादक शेतकरी देखील या परिस्थितीला अपवाद नव्हते.

त्यामुळे चालूवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी कलिंगडा कडे पाठ फिरवली. परंतु यावर्षी  सगळीकडे वातावरण मोकळे असून कोरोना बंधने देखील हटवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व बाजारपेठा पूर्ण क्षमतेने उघडे आहेत. याच परिस्थितीचा फायदाज्या शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने पुन्हा हिंमत केली व कलिंगडाची लागवड केली त्यांना चांगला होताना दिसत आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्याने कलिंगडची मागणी देखील वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होऊ लागला आहे. कलिंगड खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत असून  कलिंगड ला 12 ते 14 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हिंमत त्यालाच किंमत असते या उक्तीप्रमाणे  या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी हिंमत केलीहे शेतकरी मालामाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नक्की वाचा:मानाचा तुरा..! अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी

 अगदी कमी कालावधीत हातात येते चांगले उत्पन्न

 जर कलिंगडचा विचार केला तर लागवडीपासून अवघ्या 65 ते 70 दिवसांमध्ये हे काढणीस येते. जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था चांगली आहे. 

त्यासोबत योग्य नियोजनाची क्षमता आहे तर कलिंगड पीक तुम्हाला खात्रीने चांगले उत्पन्न देऊ शकते. हे हंगामी पीक असून मागील काही दिवसांपासून कलिंगडच्या लागवड क्षेत्रात वाढ होत होती. मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले म्हणून  यावर्षी शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीकडे दुर्लक्ष केले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी परत याच कलिंगड लागवडीमध्ये उडी घेतली आणि त्या शेतकऱ्यांची गंगे अंघोळ होईल हे स्पष्ट आहे.

English Summary: this year is so good for watermelon productive farmer get good rate in market
Published on: 04 April 2022, 11:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)