यंदाच्या हंगामात हमीभावाने ५१०० रुपयांनी ६ लाख १७ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेली प्रति हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : हरभरावरील मर रोगाचे व्यवस्थापन
त्यानुसार शेतकऱ्यांकडून हरभरा खेरदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक १५ क्किंटल ८२ किलो तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वात कमी ४ क्किंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. काही जिल्ह्याची उत्पादकता कमी आली आहे तर काही जिल्ह्याची उत्पादकता गतवर्षी एवढीच उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.
काही जिल्ह्याची उत्पादकता कमी आली आहे तर काही जिल्ह्याची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या उत्पादकता वाढली आहे, तर हिंगोली जिल्ह्याची उत्पादकता कमी झाली आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.
Published on: 02 March 2021, 11:03 IST