अनेक ठिकाणी आपण बघत असतो की जमिनीवरून घराघरात भांडणे होत असतात, जमिनीच्या तुकड्यासाठी अनेकांचे जीवही गेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांमध्ये बांधावरून वाद होतात. भावा भावामध्ये शेतीच्या वाटणीवरून हाणामाऱ्या देखील होतात, यानंतर कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, पुढे या प्रकरणाचे निकाल तसेच सुरु राहतात. ती लोक संपतात मात्र तरीही त्यांचे निकाल लागत नाहीत. मात्र तरीदेखील अनेकांना भांडणे हवीहवीशी वाटतात.
आता जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशात वेगळेच प्रकरण समोर आले आहे. छतरपूर जिल्ह्यातील एक छोटे गाव एका साईन बोर्डमुळे चर्चेत आहे. या साईन बोर्डवर ही जमीन ही वादग्रस्त आहे, ही जमीन रक्त मागत आहे. असे लिहिले आहे. यामुळे आता पोलिसांनीही अशा 'हिंसक' फलकांवर कारवाई केली असून ते हटवण्याची तयारी केली आहे. मात्र राज्यात याची चर्चा सुरु आहे.
सदर प्रकरण हे छतरपूर जिल्ह्यातील चांदला पोलीस स्टेशन क्षेत्रातील हिम्मतपूर गावातील आहे. गावापासून दूर असलेल्या मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून फलक लावण्यात आला आहे. हा फलक जिल्हा प्रशासनालाच नव्हे तर पोलीस प्रशासनालाही आव्हान देत आहे. हा साईन बोर्ड एका खासगी जमिनीवर लावण्यात आला आहे. मात्र हा फलक चर्चेचा विषय ठरत आहे. ही जमीन गावातीलच एका व्यक्तीची आहे.
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
त्यांचे नाव तिवारी असून, त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फलक कोणी लावला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. या प्रकाराचे फलक काढण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबतचा तपास आता पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार
महादेव जानकरांनी थेट गाईच्या धारा पिळत मांडले दुग्ध व्यवसायातील आर्थिक गणित, वाचा...
पेट्रोल- डिझेल स्वस्त, फायदा थेट शेतकऱ्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी
Published on: 23 May 2022, 02:36 IST